शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

पालघरकरांना गंडा घालणारा अन्सारी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:51 IST

२० हजार भरा तात्काळ ५ लाखाचे कर्ज देतो अशी जाहिरात करून पाचवी शिकलेल्या मुंबईतील ताहीर अन्सारी याने पालघरमधील बिल्डर, उच्च शिक्षितांना लाखो रुपयांचा चुना लावून पोबारा केला होता.

हितेंन नाईकपालघर : २० हजार भरा तात्काळ ५ लाखाचे कर्ज देतो अशी जाहिरात करून पाचवी शिकलेल्या मुंबईतील ताहीर अन्सारी याने पालघरमधील बिल्डर, उच्च शिक्षितांना लाखो रुपयांचा चुना लावून पोबारा केला होता. मात्र पालघरचे पोलीस उपनिरीक्षक सुहास कांबळे यांनी त्याला मुंबईतील त्याच्या कार्यालयातून अटक करून त्याची रवानगी तुरुंगात केली.मानव सेवा नावाच्या एका सेवाभावी संस्थेच्या नावाखाली २० हजार भरा, ५ लाखाचे कर्ज घ्या, ४ लाख भरा, दोन वर्षात दुप्पट रक्कम घ्या, अशी आकर्षक आमिषे दाखविणाऱ्या ेजाहिराती पालघरमध्ये त्याने प्रसिद्ध केल्या होत्या. जुन्या पालघरमध्ये राहणाºया पुष्पा रमेश पाटील या एका महिलेला त्याने आपल्या मानव संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश चे अध्यक्षपद तर राजेंद्र मोरे याला जिल्हाध्यक्षपद देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. दोघांनी पालघर स्टेशनच्या पूर्वेकडील सिद्धिविनायक सोसायटीमध्ये एक गाळा भाड्याने घेऊन तिथे आपला गोरखधंदा सुरू केला. पुष्पा पाटील आणि मोरे हे स्थानिक असल्याने त्यांच्या संपर्कातील आदिवासी, अशिक्षित तर काही बिल्डर, एमबीए झालेल्या उच्चशिक्षितांनी २५० रुपये सभासद फी चा फॉर्म भरून २० हजारा पासून ४ लाखा पर्यंतच्या रक्कमा या मानवसेवाच्या स्कीममध्ये गुंतविल्या. या योजनेचे फॉर्म भरल्या नंतर त्या फॉर्म ची व अन्य कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी दिल्ली ब्रँच मधून आॅडिटर येणार असल्याचे सांगून ग्राहकांना काही दिवस वाट बघायला लावली जायची. जिल्ह्यातील २०० ते ३०० ग्राहकांची सुमारे १९ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.नालासोपारा येथील अनिल गोंड आणि कृष्णा नामक दोन तरुणांची निवड आरोपी ताहीर अन्सारी याने आॅडिटर म्हणून केली होती. हे तरुण त्या फॉर्म मधील काही त्रुटीची पूर्तता करून देण्याच्या कामासाठी महिना, दोन महिन्यांनी येत असत. ९ वी पास असणारे हे दोन तरुण साथीदार मोठ्या खुबीने कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम करीत होते. अनेक महिने गेल्यानंतर पैसे भरूनही कर्जाची रक्कम मिळत नसल्याने ग्राहकांनी पैसे परत मागण्याचा तगादा पुष्पा पाटील यांच्या मागे लावला. आपले पैसे परत मागण्यासाठी ग्राहकांच्या संख्येत वाढ झाल्याने पुष्पा पाटीलने अन्सारीकडे विचारणा सुरू केली. मात्र तो ही टाळाटाळ करीत असल्याचे तिच्या लक्षात आल्यावर तिने सरळ पालघर पोलीस स्टेशन गाठले.या प्रकरणी तिच्या फिर्यादी वरून ताहीर अन्सारी विरोधात फसवणूक आणि एमपीआयडी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पालघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे ह्यांनी उपनिरीक्षक सुहास कांबळे ह्यांच्या कडे तपास सोपवला. आरोपी अन्सारीच्या मोबाईलवर कांबळे यांनी संपर्क साधून आपण पालघर वरून बोलतो असे सांगितल्यावर तो फोन कट करू लागला. त्यांनी दुसºया मोबाईल वरून संपर्क साधला असता आपण कुणाचे पैसे घेतले नसल्याचे सांगून पुष्पा पाटीलचे हे कारस्थान असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी फिर्यादी पुष्पांची चौकशी केली असता या प्रकरणात ती स्वत: आणि मोरे बरोबरीचे सहकारी असल्याचे निदर्शनास आले आहे.सध्या दोन्ही आरोपीवर आग्रीपाडा पोलीस स्टेशन मध्ये एक गुन्हा दाखल होऊन त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अशा भूलथापाना बळी पडू नका असे आवाहन पीएसआय कांबळी यांनी केले आहे.>आरोपीच्या अटकेसाठी असा लावला सापळाउपनिरीक्षक कांबळेंना मुख्य आरोपी हा मुंबईतील आग्रीपाडा येथे राहत असल्याची माहिती मिळाल्या नंतर त्याच्या घर झडतीत कर्ज देणे, पैसे दुप्पट करून देणे, आदी विविध प्रकारचे कोरे फॉर्म सापडले. त्याने नायर हॉस्पिटल जवळ एक आॅफिस थाटल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सरळ त्याचे आॅफिस गाठून आपल्याला २० हजार गुंतवायचे असल्याची माहिती त्यातील मुलाला दिली. त्याने अन्सारीशी संपर्क साधताच काही वेळाने तो आपल्या कार्यालयात हजर झाला आणि पीएसआय कांबळे यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने मानवसेवा नामक साप्ताहिक आणि युट्यूबवर आपले चॅनल सुरू केल्याची माहितीही पुढे आली असून चॅनल आणि साप्ताहिकचा मालक, पत्रकार असल्याने अनेक लोकांनी त्याच्यावर आंधळा विश्वास टाकला होता.