शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

कोलाची दुसरीही लाइन मंजूर

By admin | Updated: May 22, 2016 01:25 IST

तालुक्यातील जनता पाणीटंचाईने हैराण झालेली असतांना कुडूस येथील हिंदुस्थान कोकाकोला कंपनीला पाणीपुरवठा वाढविण्यासाठी दुसरी पाईपलाईन टाकण्यास मंजुरी

वसंत भोईर, वाडातालुक्यातील जनता पाणीटंचाईने हैराण झालेली असतांना कुडूस येथील हिंदुस्थान कोकाकोला कंपनीला पाणीपुरवठा वाढविण्यासाठी दुसरी पाईपलाईन टाकण्यास मंजुरी देऊन सरकारने जनतेच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शीतपेयाची निर्मिती करण्यासाठी हिंदुस्थान कोकाकोला कंपनीला सरकार दररोज लक्षावधी लिटरचा पाणी पुरवठा वैतरणेतून करीत आहे, आणि त्याच वेळी भूमीपूत्रांच्या नशिबी मात्र भीषण पाणी टंचाई लादत आहे. या कंपनीचा हा पाणीपुरवठा त्वरीत बंद करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस ,मनसे, बविआ, कुणबीसेना यांच्यासह असंख्य भुमिपूत्रांनी केली आहे. मात्र, प्रशासनाने त्यांच्या मागण्यांना धुडकावून कंपनीला नवीन पाइपलाइन टाकण्याची परवानगी दिल्याने संताप व्यक्त होत असून सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. या कंपनीला जिल्हाधिकारी आणि जलसंपदाचा आशिर्वाद असल्याचीही चर्चा आहे. अशियात सर्वात मोठा प्रकल्पकुडूस येथील कंपनीचा हा आशिया खंडातील सर्वात मोठा शीतपेय उत्पादन करणारा प्रकल्प आहे. त्यामुळे या उत्पादनाकरीता ही कंपनी प्रचंड पाणी साठा उपसत आहे. त्यामुळे वाडा तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून प्रशासनाने गंभीर दखल घेऊन हा पाणी उपसा तात्काळ बंद करावा. अन्यथा ही पाइपलाइन तोडू असे प्रशासनाला येथील भूमीपुत्रांनी बजावले आहे.काम बंद पाडलेवाडा पश्चिम विभागाचे वनपाल टी.एल. लंगडे यांनी सांगितले की, वनविभागाची परवानगी घेतलेली नसल्याने वन हद्दीतील काम आम्ही बंद केले आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अरविंद कापडणीस यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.नेत्याला कामाचा ठेकापालघर जिल्हापरिषदेच्या एका गटनेत्याला कोकाकोलाची नवीन पाइपलाइन टाकण्याच्या कामाचा ठेका दिल्याने जिल्हा परिषदेच्या परवानग्या मिळाल्याची चर्चा रंगली आहे. इतर नेत्यांचाही सहभाग असल्याने कोकाकोलाच्या नवीन पाइप लाईनला विरोध झालाच नाही.