शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याविनाच हगणदारी मुक्ती?, पालघर जि.प.ने केलेली घोषणा वादाच्या भोव-यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 04:09 IST

पालघर जिल्ह्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भीक्ष्य असतांना जिल्हा परिषदेने जिल्हा हगणदारी मुक्त झाल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ती कितपत खरी असा प्रश्न जिल्हावासीयांना पडला आहे.

- रविंद्र साळवेमोखाडा : पालघर जिल्ह्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भीक्ष्य असतांना जिल्हा परिषदेने जिल्हा हगणदारी मुक्त झाल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ती कितपत खरी असा प्रश्न जिल्हावासीयांना पडला आहे.वसई, पालघर, बोईसर, डहाणू, वाडा या तालुक्यांचा शहरी भाग सोडला तर जव्हार, मोखाडा, विक्रमगड, डहाणू, वाडा, तलासरी या तालुक्यातील आदिवासी गाव - पाड्यांतील पाणी टंचाईचा टाहो जानेवारी महिना संपताच सुरू होतो पाणीटंचाईच्या तडाख्यातून मोखाड्याचा शहरीभाग ऐन पावसाळ्यात सुध्दा वाचलेला नाही अशा स्थितीत ही घोषणा जि.प.ने केली तरी कशी असा प्रश्न आहे.ग्रामीण भागात जानेवारी महिन्याच्या अखेरीस सुरू होणारे पाण्याचे दुर्भिक्ष बघता प्रशासनाच्या कागदी घोड्यांवर विसंबून ही घोषणा जि.प.ने केली आहे. तसेच बºयाच ग्रामपंचायतीमध्ये ठेकेदाराच्या माध्यमातून बांधकाम सुरू केलेली शौचालये अपूर्णच आहेत. याबाबत एकाही ग्रामपंचायतीने ठेकेदारावर कारवाई केल्याचे समोर आलेले नाही यामुळे शौचालयाचे बांधकाम अपूर्ण असतांना हागणदारीमुक्ती झाली कशी?अधिकाºयांनी शोबाजी करून फक्त तालुक्यातील केवळ नगरपालिका, नगरपंचायती, पंचायत समित्या, ग्रामपंचायती क्षेत्रातील नागरिकांकडून अधिकाºयांनी सक्तीने शौचालये बांधून घेतली म्हणजे हागणदारी मुक्ती होत नाही. कारण या शौचालयांना पाण्याचा पुरवठाच केला गेलेला नाही. आजही ग्रामीण भागात उघड्यावर शौचालयास जाण्याचे प्रमाण अधिक आहे. तर प्रत्येक वर्षी मोखाडा तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावपाड्यांच्या संख्येत दुपटीने वाढ होत असते तर गाव - पाड्यातील जनता हातची कामे सोडून दिवस रात्र पाणी भरण्यासाठी मैलोनमैल प्रवास करीत असते. अशा स्थितीत हगणदारीमुक्तीची घोषणा कितपत सत्य मानावी.ही घोषणा म्हणजे निव्वळ हवेतला तीर- अनेक शौचालये अपूर्ण आहेत. कुठे ठेकेदाराची हलगर्जी तर कुठे अनुदानाचा हप्ताच मिळालेला नाही. अशी कारणे त्यामागे आहेत. याबाबत कुणीही आवाक्षर उच्चारत नाही.- जिल्ह्यात एकूण किती शौचालये बांधणीचे प्रस्ताव होते, किती मंजूर झाले, त्यांच्या निधीचे वाटप कसे झाले, त्यांना पाणीपुरवठा झाला का? याची कोणतीही खातरजमा प्रशासनाने केल्याचे स्पष्ट झालेले नाही.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार