शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

वाढवण बंदर सर्व्हेसाठी आलेल्यांविरुद्ध संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 00:33 IST

पोलीस ठाण्यात तक्रार : जनतेची मने वळवण्याचे प्रयत्न : महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती आंदोलन उभारणार

डहाणू/विरार : प्रस्तावित वाढवण बंदर उभारणाऱ्या जेएनपीटीविरोधात बंदर परिसरात जनक्षोभ भडकला असतानाच सोमवारी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान जेएनपीटीमार्फत येथील जनतेची मने वळविण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याकरिता ठेका घेतलेल्या मुंबईच्या कंपनीचे काही लोक वाढवण बंदराच्या सर्व्हेकरिता आले.  याची माहिती स्थानिकांना कळताच येथील लोकांचा जनक्षोभ अधिकच भडकला आणि थोडा वेळ वातावरण तंग झाले. दरम्यान, वाढवण बंदर विकसित झाले तर मुंबईपासून पालघर, डहाणू, झाईपर्यंतचा मच्छीमार समाज उद्ध्वस्त होणार असल्याने  महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीमार्फत आंदोलन उभारण्यात  येणार आहे. 

जेएनपीटीचे लोक वाढवण बंदराच्या सर्वेच्या कामासाठी आल्याचे कळताच तेथे आलेल्या गाडीला लोकांनी घेराव घातला आणि गाडीत बसलेल्या एका महिलेसह तीन जणांकडे चौकशी केली. त्या वेळी त्यांच्याकडे कोणतीही परवानगी आढळून आली नाही. त्यामुळे त्यांना चिंचणी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे सहाय्यक पोलीस निरीक्षक अल्पेश विसे यांनी चौकशी केली असता त्यांना माजी नायब तहसीलदार पिरजादा यांच्या सांगण्याने बंदराच्या माहितीसाठी वरोरचे कोतवाल नंदू जाधव यांच्याकडे पाठविले असल्याची कबुली त्यांनी दिली. त्याप्रमाणे संबंधित व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यासाठी गावकऱ्यांनी तक्रारी अर्ज दिला आहे.

दरम्यान, वाढवण बंदर विकसित झाले तर मुंबईपासून पालघर, डहाणू, झाईपर्यंतचा मच्छीमार समाज उद्ध्वस्त होईल. त्यामुळे महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या नेतृत्वाखाली आक्रमक आंदोलन उभे केले जाईल. त्यास मच्छीमार बंधू-भगिनीनी साथ द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी केले.

दरवर्षी २१ नोव्हेंबर हा जागतिक मच्छीमार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मच्छिमारांचा हा आनंदाचा, जल्लोशाचा दिवस असताना शासनातील मत्स्यव्यवसाय खात्यातील अधिकारी कशाकरिता आजच्या दिवशी शाश्वत मासेमारीच्या कार्यशाळा भरवितात, अशा सवाल किरण कोळी यांनी केला.कार्यक्रमाचे निटनेटके आयोजन करणाऱ्या गावातील संस्थांचे त्यांनी कौतुक केले. तर फेसबुक, व्हाॅटसॲपवर मोठमोठ्या भाषा करणाऱ्यांनी समाजाच्या कार्यक्रमामध्ये व मोर्चामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले. दरम्यान, कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी प्रस्तावना केली. तर विजय थाटू, फिलीप मस्तान, राजेन मेहेर, जयकुमार भाय, पूर्णिमा मेहेर इत्यादींची भाषणे झाली. व्यासपीठावर मोरेश्वर पाटील, ज्योती मेहर, उज्वला पाटील, गणेश भुर्की, इनास डेढू, सरपंच हेमलता बाळसी, उपसरपंच महींद्र पाटील इत्यादी होते.

जनजागृती यात्रा काढण्याचे आवाहनजागतिक मच्छीमार दिन कार्यक्रम अर्नाळा कोळीवाडा, विरार येथे नुकताच आयोजित करण्यात आला. या वेळी प्रथम कोळी महिलांनी कांदळवन (तिवर) झाडांची बंदरपाडा खाडीवर पूजा-आरती करून व अध्यक्ष लिओ कोलासो यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ केला. नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी वाढवण बंदराविरोधात जनजागृती यात्रा काढण्याचे आवाहन केले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार