शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अमोलच्या विमाननिर्मिती स्वप्नाला लागणार धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:51 IST

पहिला भारतीय विमान निर्माता असा सन्मान मिळविण्यास पात्र असलेल्या कॅप्टन अमोल यादव याच्या पालघर

हितेन नाईक/ निखिल मेस्त्रीपालघर : पहिला भारतीय विमान निर्माता असा सन्मान मिळविण्यास पात्र असलेल्या कॅप्टन अमोल यादव याच्या पालघर (केळवे रोड ) येथील विमान निर्मितीच्या प्रकल्पाच्या जमिनीचा वाद पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात पोहोचल्याने भारतातील विमान निर्मितीच्या त्याच्या स्वप्नाला मोठा धक्का बसणार आहे. ह्या जमिनीला न्यायालयीन स्थिगती असतानाही सरकारने सामंजस्य करार केल्याने, यादव कुटुंबियांची हे सरकार फसवणूक करीत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.केळवे रोड येथील सर्वेे नंबर १०२, १११ आदी (एकूण २१ सर्वे नंबर) असलेली जागा काही वर्षांपूर्वी किल्लेदार कुटुंबियांना शासनाने ९९ वर्षांच्या करारावर (लिज) वर दिली होती. पुढे शासनाने करार संपल्यावर त्यांच्याकडून ती परत घेतली. याविरोधात काही वर्षांपूर्वी किल्लेदार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र काही कारणास्तव त्यांनी स्वत:हून ही याचिका माघारी घेतल्याचे कळते. त्यानंतर पुन्हा त्यांनी २५ जुलै २०१७ ला या जमिनीचा मुद्दा उपस्थित करून उच्च न्यायालयात यासंदर्भातील याचिका सादर केली आहे.किल्लेदार यांची याचिका दाखल करुन घेण्यासाठी उच्च न्यायालयाने १४ जून २०१८ रोजीची तारीख दिल्याने ही याचिका दाखल करून घेतल्यास न्यायालयीन निर्णया नंतरच अमोल यांच्या विमान निर्मिती प्रकल्पाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. या जमिनीचा वाद न्यायालयात कधीही पोहचण्याची शक्यता असल्याचे माहिती असतानाही कॅप्टन अमोल सोबत त्याच्या प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्याची घाई शासनाने का? केली असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. आपल्याला परदेशातून विमान बनविण्यासाठी अनेक प्रस्ताव आले असताना त्यांने विमान निर्मितीचा कारखाना आपल्या देशातच उभारायची घोषणा केली होती. विमान निर्मितीचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी त्याने प्रचंड मेहनतीने आपली नोकरी सांभाळून प्रयत्न केले. दरम्यान, विमान बनविण्यासाठी त्याला जागा मिळत नसल्याने त्याने आपण रहात असलेल्या इमारतीच्या गच्चीवर विमान बनविले.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातील ‘मेक इन महाराष्ट्र’ कार्यक्र मात त्याच्या विमानाला जगभरातून दाद मिळाली व त्यातूनच अमोल यादव हे नाव जगासमोर आले. या कार्यक्र माच्या वेळी विमाननिर्मिती कारखान्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पालघर येथील जागाही देऊ केली होती. मात्र, ही जमीन वैयक्तिकरित्या देता येत नसल्यामुळे ती जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ व अमोल यांचा विमाननिर्मिती प्रकल्प असा करार करून ती जमीन त्याला द्यायचे ठरले होते.मोदींचे आश्वासन विश्वास ठेऊन केली सुरुवातया कारखान्यासाठीच्या जमिनीसाठी गेल्या वर्षी शासनाने ती देऊ केल्याची घोषणा केली होती यासाठी शासनाकडून विलंब होत असला तरी अमोलने आपल्या पुढील १९ आसनी विमान बांधणीचा प्रारंभही केला आहे.पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी वेळोवेळी दिलेल्या आश्वासना वर विश्वास टाकून आपल्या आयुष्याची पुंजी, मेहनत आणि अनुभव त्याने पणाला लावत असताना शासन मात्र शहानिशा न करताच ह्या जमिनी बाबत जाहीरपणे आश्वासन देत असल्याने उच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेतल्यास अमोल यादव आणि त्याच्या कुटुंबियांची मेहनत वाया जाऊन त्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची पाळी ओढवू शकते.यापूर्वीही अमोल याने अथक परिश्रमातून बनविलेल्या सहा आसनी विमानाच्या परवानग्यांसाठी त्याला शासनदरबारी संघर्ष करावा लागला. यानंतर त्याला आता त्याच्या कारखान्यासाठीच्या जागेसाठी संघर्ष करावा लागणार आहे.परिणामी अमोलचे या कारखान्यातून निघणार्या विमानाचे उड्डाण लांबणीवर पडणार असेच चित्र दिसते आहे.