शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

वसईतील सर्वच राजकीय पक्षांची कार्यालये अनधिकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 23:57 IST

वसई तालुक्यात गेल्या २५ वर्षांपासून निर्विवाद सत्ता असलेली बहुजन विकास आघाडी असो की सर्वच राजकीय पक्ष असो प्रत्येकाने कुठेना कुठे नाल्यावर, रस्त्यावर जागा मिळेल त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामे उभी करून पक्षाची कार्यालये थाटली आहे.

नालासोपारा : वसई तालुक्यात गेल्या २५ वर्षांपासून निर्विवाद सत्ता असलेली बहुजन विकास आघाडी असो की सर्वच राजकीय पक्ष असो प्रत्येकाने कुठेना कुठे नाल्यावर, रस्त्यावर जागा मिळेल त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामे उभी करून पक्षाची कार्यालये थाटली आहे. या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी मनपा किंवा कोणत्याही सामाजिक संघटनेने पुढाकार न घेता आजपर्यंत ते काणाडोळा करतच आले आहे. आता अशा अनधिकृत पक्षांच्या कार्यालयांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. वसई विरार मनपाचे आयुक्त बळीराम पवार त्यांच्यावर कारवाई कधी करणार याकडे सर्व सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.वसई तालुक्यात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सरकारी जागा, गार्डन, शाळा, हॉस्पिटल याव्यतिरिक्त आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकामे वसई विरार मनपाने भुईसपाट केली आहेत. कित्येक गरीब लोकांना व जनतेला सणांच्या वेळी, उन्हाळ्यात, पावसाळ्यात बेघर केले आहे पण या राजकीय पक्षांच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाई करण्याची साधी हिंमत दाखवली नसल्याने लोकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. या अशा राजकीय पक्षांच्या कार्यालयाला तर मनपाने साधी नोटीस सुद्धा धाडली असल्याचे आठवत नाही. मनपात सत्ताधारी पक्षातले नगरसेवक, दुसऱ्या पक्षातील नगरसेवक, विविध पक्षातील नेतेमंडळी बिनधास्त नाले व मोकळ्या जागेवर आपली अनधिकृत कार्यालये उभी करून आपले बस्तान मांडताना दिसत आहे पण मनपा मूग गिळून, गप्प बसून कारवाई का करत नाही हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.मनपा अनधिकृत बांधकामावर कारवाई करतांना रीतसर नोटीस पाठवून पोलीस बंदोबस्त घेऊन कारवाई करते मग आजपर्यंत मनपाने किती राजकीय पक्षांच्या अनधिकृत कार्यलयांची दखल घेऊन त्यापैकी कितींना नोटीसा पाठवल्यात? राजकीय पक्षांच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाई करण्यासाठी मनपावर काही दबाव तर येत नाही ना?महापालिकेची राजकीय पक्षांवर मेहरनजरवसई तालुक्यात कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी व लोकांच्या मदतीसाठी धावून जाणाº्या पोलिसाची मात्र मनपाकडून उपेक्षाच झाली आहे. पोलीस स्टेशनला जागा देण्यासाठी मनपा कायद्यावर बोट ठेवत आहे पण राजकीय पक्ष गटारावर आणि रस्त्यावरील मोकळ्या जागेवर बिनधास्त कब्जा करून तिथे अनधिकृत कार्यालये बांधत आहे.पोलीस स्टेशनला जागा द्यायची म्हटले की सिडकोने डीपी प्लॅन मध्ये कुठेही तशी जागा ठेवली नसून २०२१ सालापर्यंत वाट पाहण्यास सांगत आहे. तुळींज पोलीस स्टेशन गटारावर आहे म्हणून मागे औपचारिकतेचे कारण देऊन नोटीस पाठवली मग अशा राजकीय पक्षांच्या अनधिकृत कार्यालयाला किती नोटीसा पाठवल्यात?

टॅग्स :Vasai Virarवसई विरार