शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
3
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
4
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
5
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
6
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
7
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
8
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
9
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
10
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
11
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
12
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
13
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
14
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
15
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
16
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
17
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
18
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
19
रिअलमीचा धमाका! ७०००mAh बॅटरीसह Realme Narzo 90 सिरीज भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत
20
हायड्रोजन कारची जगातील पहिली क्रॅश टेस्ट झाली; ह्युंदाई नेक्सो किती आहे सुरक्षित...
Daily Top 2Weekly Top 5

गॅसचा टँकर नदीत कोसळून वायुगळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 23:34 IST

रायते पुलावरील घटना : चालक जखमी; वायुगळती थांबवण्यात आले यश

टिटवाळा / म्हारळ : कल्याण-मुरबाड महामार्गावरील रायते पुलावरून एलपीजीने भरलेला टँकर बुधवारी मध्यरात्री उल्हास नदीत कोसळून वायुगळती झाली. पहाटे ही वायुगळती थांबवण्यात यश आले. अपघातात टँकरचालक जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबईतील चेंबूरहून मुरबाडकडे हा एलपीजी गॅसचा टॅँकर जात होता. रायते पुलाजवळ असलेल्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे लोखंडी रेलिंग तोडून हा टॅँकर ४० फूट खाली नदीत कोसळला. याबाबत टिटवाळा येथील युवक तुषार गिरीराज याने तत्काळ टिटवाळा पोलीस ठाण्यात कळवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मुरबाड पोलीस उपविभागीय अधिकारी गायकवाड, टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र आहिरराव यांनी घटनास्थळी धाव घेतली.

या अपघातात चालक तेरसू यादव हा जखमी झाला आहे. त्याला प्रथम गोवेली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उल्हास नगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, टॅँकरमधील एलपीजीची पाण्यात गळती झाल्याने पोलिसांनी हा रस्ता बंद केला. तसेच तेथे जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यानंतर, अग्निशमन दल आणि गॅस कंपनीच्या वायू नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे प्रमोद कोलते यांच्यासह आर. मायकल आणि रितेश कुमार यांनी नदीत उतरून वायुगळती तात्पुरती बंद केली. हा टॅँकर नदीत कोसळल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे अहिरराव यांनी सांगितले. दरम्यान, एलपीजी गॅस पाण्यावर तरंगत असल्याने टिटवाळा पोलिसांनी हा परिसर बंद केला. टँकरमध्ये ३६ हजार लीटर एलपीजी गॅस आहे. हा गॅस दुसऱ्या टॅँकरमध्ये साठवण्यात येणार आहे, असे वायुगळती नियंत्रण पथकाच्या आर. मायकल यांनी सांगितले. घटनास्थळी पोलीस पथक तैनात असून गॅसमुळे कुणाला त्रास होत आहे का, याचीही माहिती घेण्यात येत आहे.गॅस टॅँकर नदीत कोसळल्याची माहिती मिळताच मध्यरात्री २ वाजता त्वरित घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचताच वायुगळतीवर नियंत्रण आणले. - प्रमोद कोलते,अग्निशमन अधिकारी, कल्याण