शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

वायू वादळाने डहाणूत चिकूची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 23:27 IST

५५० मॅट्रिक टन उत्पादनावर परिणाम; बागायतदारांची भरपाईची मागणी

बोर्डी : वायू चक्रीवादळादरम्यान सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने चिकू फळांची मोठ्या प्रमाणावर गळती होऊन बागायतीत फळांचा खच पडला आहे. या फळाचे तालुक्यातील क्षेत्र साडेपाचहजार हेक्टर असून सुमारे साडेपाच मॅट्रिक टन फळांचे नुकसान झाल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. दरम्यान शासनाने तत्काळ भरपाई जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.अरबी समुद्रात मागील आठवड्यात वायू चक्र ीवादळ निर्माण झाले होते. ते खोल समुद्रातून मुंबई, पालघर आणि गुजरातच्या दिशेने पुढे सरकत गेले. या काळात वादळी वारे वाहून जिल्ह्यात जीवित आणि वित्तहानी झाल्याची नोंद झाली नसली, तरी जोराच्या वाºयामुळे बागायतीतील छोट्या चिकू फळांची मोठ्या प्रमाणात गळती होऊन बागायतदारांना नुकसान सोसावे लागले आहे. डहाणू तालुक्यातील हे प्रमुख फळपीक असून त्याचे नोंदणीकृत क्षेत्र साडेपाचहजार हेक्टर तर नोंदणी न झालेले क्षेत्रही मोठे आहे. एकूण जिल्ह्याचा विचार करता त्यामध्ये मोठी वाढ होईल. दरम्यान वाºयामुळे एका झाडाखाली किमान पाच किलो फळगळती झाली आहे. ही फळे पक्व झाली असती, तर त्यांचे वजन दुपटीने वाढले असते. त्यानुसार एका एकरात ४० झाडे या प्रमाणे ४०० किलो फळांचे नुकसान झाले आहे. तर एका हेक्टरात १०० झाडांप्रमाणे १ टन फळांचे नुकसान झाले आहे. एकूण साडेपाचहजार हेक्टराचा विचार केला असता, ५५ हजार झाडांचा समावेश असून ५५० मॅट्रिक टन उत्पादन वाया गेले आहे. शिवाय सातबाºयावर नोंदणी न झालेल्या झाडांचे प्रमाणही मोठे असल्याने हा आकडा वाढणार आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान झालेल्या बागायतदारांचे प्रमाण मोठे आहे.तर ही झळ चिकू फळतोडणी करणाºया आदिवासी मजुरांनाही बसणार असून त्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागणार आहे. तालुक्यात रोजगाराअभावी स्थलांतराचा प्रश्नही ऐरणीवर आहे. काही कुटुंबात कुपोषित बालकांचे प्रमाणही दिसून येते. त्यामुळे तालुक्याला रोजगार देणाºया या चिकू फळांचे झालेले नुकसान पाहता, तत्काळ शासनाने नुकसान भरपाई घोषित करण्याची मागणी बागायतदारांनी केली आहे.वायू चक्र ीवादळामुळे चिकू बागायतींमध्ये मोठ्या प्रमाणावर फलगळती झाली आहे. त्याचा फटका आगामी उत्पादनावर होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. याकरिता शासनाने तत्काळ मदत जाहीर करणे आवश्यक आहे.- देवेंद्र राऊत, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त बागायतदार