शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार महापालिकेतील वर्ग-३ ची रिक्त पदे भरण्यासाठी एजन्सी नेमणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 00:48 IST

आयुक्त गंगाथरन डी. यांचे संकेत : भरतीची ई-निविदा प्रक्रिया सुरू

वसई : वसई-विरार शहर महापालिकेमधील अपुरा कर्मचारी वर्ग तसेच वषार्नुवर्षे संवर्गातील भरणा न केलेली रिक्त पदे व पालिका संदर्भातील मंजूर आकृतिबंधानुसार लवकरच वर्ग-३ ची रिक्त पदे भरण्यासाठी महापालिका प्रशासन एजन्सी नेमणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी. यांनी स्पष्ट केले आहे.

वसई-विरार शहर महानगर-पालिकेची स्थापना होऊन ११ वर्षे होत आली, मात्र पालिका स्थापनेनंतर ४ नगरपरिषदा व संबंधित ग्रामपंचायतीमधील कर्मचारी महानगरपालिकेत वर्ग करण्यात आले, परंतु यातील कर्मचारी वर्ग अपुरा पडत असल्यामुळे आजवर व सध्या ठेका पद्धतीने कर्मचारी नेमून त्याद्वारे कामकाज केले जात आहे.

दरम्यान, महापालिकेच्या मंजूर आकृतिबंधानुसार वर्ग-३ ची विविध संवर्गातील पदे महानगरपालिकेत आजही रिक्त आहेत आणि हीच रिक्त पदे लवकरात लवकर भरणे अपेक्षित असल्याने याकरिता महापालिकेकडून वेळोवेळी प्रयत्न सुरू होते. त्याच अनुषंगाने महापालिकेमार्फत वर्ग-३ च्या पदांची संगणक प्रणालीद्वारे भरती प्रक्रिया करण्याकामी अनुभवी सक्षम यंत्रणा/अभिकर्त्याची (एजन्सीची) नेमणूक करण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.महापालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी सक्षम यंत्रणा/अभिकर्ता (एजन्सी) नेमण्याकामी महानगरपालिकेतर्फे ई-निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून याबाबतीत एजन्सी नेमल्यानंतर सदर भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. तर नवीन भरती केल्याने महानगरपालिकेस स्वत:चा जबाबदार कर्मचारी वर्ग उपलब्ध होईल व त्यांच्यावर जबाबदारी निश्चित होऊन महानगरपालिकेच्या कामाच्या दर्जातदेखील सुधारणा होईल, असे आयुक्त गंगाथरन डी. यांनी निर्देशित केले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार