शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

वय वर्ष ४४, मात्र वाढदिवस १२ वा, करावी लागते चार वर्ष प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 00:35 IST

२९ फेब्रुवारीला जन्म झालेल्यांना आणि त्यांच्या आप्तेष्टांकरिता आजचा दिवस खूपच महत्त्वाचा आहे.

अनिरुद्ध पाटीलडहाणू/बोर्डी : २९ फेब्रुवारीला जन्म झालेल्यांना आणि त्यांच्या आप्तेष्टांकरिता आजचा दिवस खूपच महत्त्वाचा आहे. त्यामुळे ४४ वर्षीय शैलेश गोंधळेकर (रा. चिखले) यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्याकरिता डेस्टिनेशन सेलिब्रेशनचे आयोजन करून १२ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शैलेशसारख्या अनेकांकरिता हा दिवस खास होता.२९ फेब्रुवारी ही तारीख दर चार वर्षांनी येत असल्याने हे लीपवर्ष सर्वांच्या लक्षात राहते. या दिवशी ज्यांचा जन्म होतो, त्यांना मात्र प्रत्येक वर्षी वाढदिवस साजरा करता येत नसल्याने त्यांच्याकरिता हा दिवस सोहळाच असतो. त्यामुळे त्यांचे वय आणि त्यांना वाढदिवस साजरा करण्यासाठी मिळालेले वर्ष यांचे प्रमाण खूपच कमी असते.या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याने हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतो. आपल्या आयुष्यातील काही आठवणी हटके करण्याची इच्छा अनेकांमध्ये दिसून येते. त्यातूनच आजच्या दिवशी वास्तुशांत, नवीन गाडी खरेदी आणि लग्न सोहळा उरकून घेण्याचे आयोजन केले जाते.आरोग्य क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा शिरकाव झाल्याने सिझेरियन पद्धतीने प्रसूती करणे शक्य झाले आहे. तथापि काही दाम्पत्यांकडून या दिवसाला प्राधान्य दिला जातो.>४४ वर्षीय शैलेश गोंधळेकर यांचा १२ वा वाढदिवस त्यांच्या कुटुंबीयांनी डेस्टिनेशन सेलिब्रेशनद्वारे साजरा केला.