शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा ग्रीन कॉरिडॉर

By admin | Updated: August 7, 2015 22:54 IST

हृदयाच्या पुणे-मुंबई प्रवासाची घटना ताजी असताना शुक्रवारी पुन्हा एका हृदयाचा वाशी ते मुलुंडपर्यंतचा प्रवास यशस्वी झाला. वाहतूक पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉरचा वापर

नवी मुंबई : हृदयाच्या पुणे-मुंबई प्रवासाची घटना ताजी असताना शुक्रवारी पुन्हा एका हृदयाचा वाशी ते मुलुंडपर्यंतचा प्रवास यशस्वी झाला. वाहतूक पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉरचा वापर केल्यामुळे १९ किमीचा प्रवास फक्त १४ मिनिटांत पूर्ण करण्यात आला.नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षामध्ये पहाटे साडेसहाच्या दरम्यान फोन आला. वाशीतील एमजीएम रुग्णालयातून एक हृदय १० वाजेच्या दरम्यान मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात घेऊन जायचे आहे. रुग्णवाहिकेला अडथळा होऊ नये यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. काही क्षणांत पोलीस यंत्रणा वेगाने कामाला लागली. वाहतूक पोलीस उपायुक्त अरविंद साळवे यांनी तत्काळ वाशी, एपीएमसी, तुर्भे, रबाळे, महापे व सीवूड वाहतूक पोलीस चौकीच्या प्रमुखांना संदेश पाठविला. जवळपास ७० वाहतूक पोलीस, चार अधिकारी यांनी ग्रीन कॉरिडॉर करण्याचे नियोजन केले. वाशी एमजीएम, अरेंजा सर्कल, महापे पूल, ठाणे-बेलापूर रोड ते ऐरोलीमार्गे मुलुंडपर्यंत रुग्णवाहिका घेऊन जाण्याचे निश्चित करण्यात आले.वाशीवरून सकाळी १०.२६ ला हृदयाचा प्रवास सुरू झाला. सकाळी सर्वाधिक वाहतूक असणाऱ्या मार्गावरून रुग्णवाहिका घेऊन जायचे होते. कुठेही अडथळा येऊ नये यासाठी प्रत्येक चौक, जोडरस्ता, उड्डाणपुलाजवळ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले. रुग्णवाहिकेच्या प्रवासादरम्यान इतर वाहतूक काही वेळ थांबविण्यात आली. वाशी वाहतूक पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी पायलट व्हॅनचे सारथ्य केले. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामधील १७ व मुुंबई आयुक्तालय हद्दीतील दोन असा १९ किमीचा प्रवास फक्त १४ मिनिटांत पूर्ण करण्यात आला. (प्रतिनिधी)