शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

पेंटिंग्जनंतर वारली चित्रशैलीचे ‘टॅट्यू फिव्हर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 03:42 IST

पर्यटक व तरुणाईतून पसंती : जव्हार-मोखाड्याच्या ७३ हरहुन्नरी कलाकारांना मिळाला रोजगार

हुसेन मेमनजव्हार : रोजगार, कुपोषण आणि दुष्काळ अशी ओळख असणाऱ्या जव्हार तालुक्यात आपल्या पारंपारिक कलागुणांना वाव देत टॅट्यूरेखांकनाचे नवे दालन तरुणांना रोजगार उपलब्ध देणारे ठरले आहे. वेस्ट्न टच असणारा हा व्यवसाय हुरहुन्नरी आदिवासी तरुणांनी आपल्या वारली आर्टमुळे आवाक्यात आणला आहे.

वेगवेगळ्या छटा व अर्थ सांगणारी वारली पेंटिग तशी जग प्रसिद्ध असली तरी टॅट्यूम्हणून अजून तिचा विचार झाला नव्हता. येथे भेट देणाºया अनेक पर्यटकांनी आपल्या हातावर, मानेवर, पाठीवर व चेहºयावर हे टॅट्यू कोरल्याने सध्या त्याचे फिव्हर तरुणाईत सुद्धा पहावयास मिळत आहे. जव्हार मोखाडा या आदिवासी तालुक्यात जवळपास ७३ हुन अधिक आदिवासी वारली पेंटिंग कलाकारांना वेगवेगळ्या प्रकारच्या वारली पेंटिंग व टॅट्यू रेखांकनामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. जव्हारमधील काही आदिवासी तरु णांनी गोव्यात जावून वारली पेंटिंगमध्ये टॅट्यू कसे काढावे हे शिक्षण घेतले. याच तरु णांनी १५ ते २० तरुणांना त्याचे प्रशिक्षण दिले. त्यामुळे टॅट्यू वारली पेंटिंग निर्मितीत आदिवासी तरुणांना मोठ्या रोजगाराची निर्मिती झाली आहे. तालुक्याच्या ठिकाणी अनेक शिक्षण संस्था असून लांबलाबचे विद्यार्थी येथे अध्ययनासाठी येथे येत असल्याने त्यांनीही या कलेत रस दाखवायला सुरुवात केली आहे.

आदिवासी वारली हस्तकला, पहाडी भवन वारली पेंटिंग हस्तकला, वारली चित्रकार, अशी जव्हार शहराच्या ठिकाणी स्टुडिओ व खेडोपाड्यात त्यांनी स्वता:च्या घरात वारली पेंटिंग व्यावसाय सुरु केले आहेत. यामध्ये बॉलपीस पेंटिंग, कॅनवास, लाकडी फ्रेम, पेन स्टॅन्ड, टी पोलटर्स, कि चैन, वॉल हँगिंग, ट्रे तसेच कपड्यावर, बेडशीट, ओढणी, पंजाबी ड्रेस, टी शर्ट, साडी कॉर्नर तसेच आॅर्डरप्रामाणे वारली पेंटिंग केली जात आहे. टी शर्टवर वारली पेंटिंगवर करून घेण्याचे सध्या स्थानिक तरुणांमध्ये क्रेझ आहे.जव्हारला थंड हवेमुळे मिनी महाबळेश्वर असे संबोधन असले तरी पर्यटन व्यवस्था व त्या दृष्टीने नियोजन नसल्याने येथे पर्यटन व्यवसाय हवा तसा फोफावला नाही. काही मोजके धाबे, हॉटेल वगळता तरुणांवर बेकारीची कुºहाड असते. मात्र वारली चित्रशैलीचे टॅट्यू पसंतीस उतरत असल्याने त्यांना रोजगाराचे नवे दालन उपलब्ध होत आहे. त्यातच नाशिक, मुंबई ठाण्यातील अधिकारी वर्गाने या पेंटींग्स सोबत नेल्याने या कलेची ओळख वाढत आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार