शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन अर्जासाठी तब्बल ३ ते ४ तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:17 IST

मीरा- भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी तब्बल ३ ते ४ तास लागत आहे. यामुळे पहिल्या दिवशी अर्ज

मीरा रोड : मीरा- भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी तब्बल ३ ते ४ तास लागत आहे. यामुळे पहिल्या दिवशी अर्जदाखल झालेला नाही. पालिका सचिवांनीही बुधवारी एकही अर्ज आला नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर शपथपत्र नसल्याने तसेच अन्य तांत्रिक अडचणींमुळे महापौरांनी भरलेला अर्ज देखील स्वीकारला गेला नसल्याचे स्पष्ट झाले. सर्व्हर डाऊन होत असल्यासह काही माहिती भरणे किचकट असल्याचा सूर इच्छुकांनी लावला आहे. यामुळे अर्ज भरण्यास विलंब होत असून उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.आॅनलाइन अर्ज भरल्यावर त्याची प्रतही त्या प्रभागातील निवडणूक अधिकाºयाकडे सादर करायची आहे. परंतु आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांना सर्व्हर डाऊन होत असल्याने चांगलाच मनस्ताप होत आहे. सर्व्हर डाऊन असल्याने अर्ज भरण्यासाठी वेळ लागत आहे. त्यामुळे उमेदवाराला काही तास ताटकळत बसण्या शिवाय पर्याय नाही. त्यातच अर्जात एकही रकाना रिक्त ठेवायचा नाही. मागील तीन वर्षाचे आयकर रिटर्न भरण्यासह सेल्स टॅक्स, प्रोफेशन टॅक्स, संपत्ती कर लागू असल्याची माहितीही द्यायची आहे. आयकर हा २०१६-१७ चा नव्हे तर त्या आधीच्या तीन वर्षाचा भरल्याची माहितीही द्यायची आहे. याशिवाय सोने, चांदी, हिरे याची स्वतंत्र माहिती भरायची आहे. पती वा पत्नीच्या मालमत्तेसह अवलंबिताचीही सविस्तर माहिती द्यायची आहे.आॅनलाइन अर्जात सूचक, अनुमोदक यांची स्वाक्षरी तसेच मुद्रांक पेपरची आवश्यकता नाही. निवडणूक अधिकाºयाकडे अर्ज सादर करताना सूचक, अनुमोदक याची स्वाक्षरी लागणार आहे. तसेच शपथपत्र मुद्रांक पेपरवर देण्याची गरज नसून केवळ नोटरी करायची आहे.विशेष म्हणजे उमेदवाराची शैक्षणिक पात्रता विचारतानाच त्यात ग्रेडचाही रकाना आहे. वास्तविक ग्रेड आदी दहावी व त्यानंतरच्या काही परीक्षांना असते. मीरा भार्इंदर संघर्ष मोर्चाच्या प्रभाग १ मधील उमेदवार सरिता शिंदे यांना एसएनडीटी महाविद्यालयात असताना १३ वीला एटीकेटी लागली होती. पण एटीकेटीचा पर्यायच नसल्याने तसेच ग्रेडची माहिती द्यायची असल्याने शेवटी त्यांनी बारावी इतकीच शैक्षणिक पात्रता असल्याचा उल्लेख केला आहे.भाजपाच्या वतीने उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी बुधवारी महापौर गीता जैन यांनी प्रभाग सहामधून अर्ज भरायला घेतला असता त्यांना जवळपास तीन तास लागले. सर्व्हरमुळे शिवाय जैन यांच्या मालमत्तेचीही माहितीही मोठी असल्याने वेळ लागला. त्यानंतर महापौरांनी निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन अर्ज सादर केला. परंतु आॅनलाइन अर्ज स्वीकारला गेला नसल्याने तसेच शपथपत्र आदी कारणांमुळे महापौरांनी भरलेला अर्ज बुधवारी अधिकाºयाने घेतला खरा पण तो स्वीकारला गेला नाही असे सूत्रांनी स्पष्ट केले.