शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महालक्ष्मी यात्रेसाठी प्रशासनाकडून आढावा, प्रांताधिका-यांनी घेतली बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 00:29 IST

डहाणू तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महालक्ष्मी देवीची यात्रा ३० मार्चपासून सुरू होत आहे. या निमित्ताने भाविकांच्या सोयीसुविधा व तयारी संदर्भात मंदीर ट्रस्ट कार्यलयात सोमवारी सभा आयोजित केली होती.

- शशिकांत ठाकूरकासा : डहाणू तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महालक्ष्मी देवीची यात्रा ३० मार्चपासून सुरू होत आहे. या निमित्ताने भाविकांच्या सोयीसुविधा व तयारी संदर्भात मंदीर ट्रस्ट कार्यलयात सोमवारी सभा आयोजित केली होती.सलग १५ दिवस चालणारी ही जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा असून पालघर, ठाणे, मुंबई बरोबरच गुजरात राज्यातील हजारो भाविक या निमित्ताने येथे येत असतात. सतत १५ दिवस चालणाऱ्या ह्या यात्रेत लाखो भाविक येतात. त्यामुळे भाविकांच्या सोयीसुविधा, कायदा व सुव्यवस्था चोख राहावी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने डहाणू उपविभागीय अधिकारी आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून यात्रा परिसरातील सर्व विहिरींची स्वच्छता केली असून आरोग्य, शौचालय, पिण्याचे पाणी आदींच्या सुविधा भाविकांना दिल्या जाणार आहेत. ग्रामपंचायती कडून मंदिर व यात्रा प्रांगणात साफसफाई व पाणी सुविधेसाठी कामगारांची नेमणूक केली जाणार आहे. दूरवरील भाविकांसाठी डहाणू आगरातून विशेष बस सुविधा केली जाणार आहेत.यात्रे दरम्यान चोख पोलीसबंदोबस्त ठेवला जाणार असून यात्रे परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष निगराणी ठेवली जाणार आहेत. यावेळी प्रांताधिकारी आंचल गोयल व डहाणूचे तहसीलदार राहुल सारंग यांनी तयारी संदर्भात उपस्थित अधिकारी व दुकानदारांना सूचना दिल्या आहेत.या यात्रा तयारीची आढावा बैठक आठवडा भरात घेतली जाईल असे सारंग यांनी सांगितले यावेळी डहाणू पंचायत समिती सभापती राम ठाकरे, महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष संतोष देशमुख, जव्हार पोलीस उपविभागीय अधिकारी सुरेश घाडगे, कासा सहाय्यक पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुठे, डहाणू सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, सरपंच सुंदर झरिवा, ट्रस्टचे कोषाध्यक्ष वसंत सातवी, मधु सातवी, रमेश मलावकर, अनंता खुलात, व आरोग्य, विद्युत, बांधकाम, पशुवैद्यकीय, महसूल एस.टी. महामंडळाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.४० सीसीटीव्ही अन् ६० सुरक्षारक्षकट्रस्ट कडूनभाविकांच्या दर्शन व्यवस्थेसाठी तीन रेलिंग शेड उभारले आहेत. दर्शन सुरळीत होण्यासाठी ६० सुरक्षा रक्षक, २० स्वयंसेवक तर साफसफाई साठी १५ सफाई कामगार यांची नेमणूक केली असून भाविकांच्या सुरिक्षतेतसाठी मंदिर परिसरात ४० सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून पाण्याची सोय, तसेच मुख दर्शनाची सुविधा केली जाणार असल्याचे यावेळी ट्रस्टचे कार्यवाह शशिकांत ठाकूर यांनी सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार