शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूत रेशनिंगचा ठणठणाट

By admin | Updated: September 7, 2015 03:45 IST

डहाणू तालुक्यातील दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या आदिवासींच्या कारवीच्या झोपडीतील चूल पेटते ती रास्तभाव दुकानातून मिळणाऱ्या धान्याच्या भरवशावर.

डहाणू : डहाणू तालुक्यातील दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या आदिवासींच्या कारवीच्या झोपडीतील चूल पेटते ती रास्तभाव दुकानातून मिळणाऱ्या धान्याच्या भरवशावर. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून तांदूळ, गहू, तेल, साखर मिळाले नसल्याने येथील घरोघरी उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून कुपोषणाच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. शिवाय या भागातील केशरी कार्डधारकांना गत नऊ महिन्यांपासून रेशनचे धान्य मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.ज्या बचतगटांकडे या दुकानाचे परवाने आहेत. त्यांनी धान्य व रॉकेल मिळण्यासाठी लागणारे पैसे भरल्यानंतरही हा पुरवठा होत नसल्याने त्यांनी मोर्चा काढण्याचा इशारा डहाणूच्या तहसीलदारांना यांना दिले आहे. शासनाने गेल्या सहा महिन्यापासून रेशनीगवरील धान्य कमी केल्याने अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी मेटाकुटीला आला आहे.विशेष म्हणजे डहाणूतील महिला बचत गट परवाने धारकांनी धान्य उचलण्यासाठी पुरवठा शाखेत जून, जुलै, आॅगस्ट असे तीन महिन्याचे पैसे भरले आहेत. परंतु बोरीवली, भिवंडीच्या एफ.सी.आय. गोडाऊन मधून डहाणूत पुरेशा प्रमाणात धान्यपुरवठा होत नसल्याने रास्तभाव दुकान चालविणारे महिला बचत गट हवालदिल झाले आहे. जर धान्य गोदामात नसेल तर पैशांचा भरणा करण्याचा अट्टाहास का असा सवाल रेशन दुकानदारांचा आहे. त्यामुळे डहाणू तालुक्यातील रास्तभाव तसेच किरकोळ रॉकेल परवानेधारकांनी मोर्चा, धरणे आंदोलन करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे डहाणूच्या तहसीलदार प्रितीलता कौरथी यांना दिला आहे. (वार्ताहर)