शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहापासून आदिवासी विद्यार्थी अद्यापही वंचितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 00:41 IST

शाळा व महाविद्यालय सुरू होऊन चार महिने झाले तरीही आदिवासी विद्यार्थी हे निवासी शासकीय वसतिगृहापासून वंचित आहेत. त्यांना तातडीने प्रवेश देण्यासाठी आॅनलाईन प्रवेश सुरू करा अन्यथा, मी उपोषण सुरू करेन असा इशारा आमदार अमित घोडा यांनी स्व:पक्षाच्याच सरकारला दिला आहे.

डहाणू : शाळा व महाविद्यालय सुरू होऊन चार महिने झाले तरीही आदिवासी विद्यार्थी हे निवासी शासकीय वसतिगृहापासून वंचित आहेत. त्यांना तातडीने प्रवेश देण्यासाठी आॅनलाईन प्रवेश सुरू करा अन्यथा, मी उपोषण सुरू करेन असा इशारा आमदार अमित घोडा यांनी स्व:पक्षाच्याच सरकारला दिला आहे.डहाणूत प्रांताधिकारी नसल्याने शेकडो विद्यार्थ्यांना जातीचे दाखले अद्याप मिळाले नाहीत त्यामुळे त्यांना आॅनलाइन प्रवेश अर्ज करता आले नाहीत. शिवाय नामांकित इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांना आदिवासी विकास प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे अद्यापही घरी बसण्याची वेळ आली आहे. परिणामी अनेक हजारो आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते आहे.वेळोवेळी पाठपुरावा करून देखील या समस्यां सोडविण्याकरिता डहाणूचा आदिवासी विकास प्रकल्प अपयशी ठरला असल्याने याबाबत आमदार अमित घोडा यांनी आवाज उठवला असून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा सोमवारी डहाणू येथील विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिला आहेयाबाबत ते म्हणाले की हे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन चार महिने झाले. मात्र आदिवासी विद्यार्थ्यांच्या सोई सुविधा असलेल्या निवासी शासकीय वस्तीगृहात अद्यापही तीनशे ते चारशे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही आहे त्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात पहाटे पासून घरातून निघून संध्याकाळी घरी यावे लागते. शिक्षण नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कासा ,बोर्डी, चिंचणी भागात नवीन वसतिगृह सुरु करण्याची गरज असताना मात्र गेल्या १५ वर्षांपासून एकही वसतीगृह बांधले नाही किंवा विद्यमान शासकीय वसतिगृहांची क्षमता वाढवली नाही त्यामुळे आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ते पुढे म्हणाले की, नामांकित इंग्रजी माध्यमाच्या हायस्कूल मधील विद्यार्थ्यांच्या पालकांना कोणतीही पूर्व सूचना न देता २४ आॅगस्ट रोजी आदिवासी प्रकल्पाने दोन बस मधून नचिकेता हायस्कूल मधून डहाणू आणि जव्हार प्रकल्पाचे विद्यार्थी परस्पर पनवेल येथील शाळेत स्थलांतरित केले तिथे असंख्य गैरसोयी असल्याने पालकांनी आपल्या मुलांना तिथून परत आपल्या घरी आणले आहे ते आजतागायत घरीच बसले आहेत. त्यांनी आदिवासी विकास विभागावर चौफेर टीका केली ते शेवटी म्हणाले की डहाणूत ६ महिन्यापासून प्रकल्प अधिकारी , प्रांताधिकारी नाही त्यामुळे शेकडोंचे दाखले रखडले आहेत.हा तर राज्य सरकारला घरचा आहेर!निवासी वसतीगृहासाठी त्यांना अर्ज करता आले नाहीत.त्यामुळे वंचित राहिलेल्या आदिवासी मुलांच्या वसतिगृह प्रवेशासाठी पुन्हा आॅनलाइन प्रवेश प्रक्रि या सूरु करून त्यांना न्याय द्यावा अन्यथा १५ दिवसानंतर आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसू.विद्यार्थी व पालक तसेच विविध आदिवासी शैक्षणिक संघटना देखील आपल्यासोबत उपोषणास बसणार आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. शिवसेना भाजप सरकारमध्ये सहभागी आहे त्यामुळे घोडा यांचा इशारा हा सरकारला घरचा आहेर असल्याचे मानले जाते आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार