शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अखर्चिक 57 कोटींचा निधी विकासकामांवर खर्च करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 01:18 IST

जि.प. सर्वसाधारण सभा : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : जिल्हा परिषदेचा अखर्चिक राहिलेला ५७ कोटींचा निधी कुठल्याही परिस्थितीत परत न जाता त्याचा वापर मार्चअखेर जिल्ह्यातील विकासात्मक बाबींसाठी खर्च केला जाईल, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी व्यक्त केला आहे.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी जि.प. अध्यक्षा भारती कामडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला अनेक विभागांचे प्रमुख अधिकारी अनुपस्थित राहिल्याने सभेत नाराजी व्यक्त करण्यात आली. यापुढे विभागप्रमुख किंवा अधिकारीवर्ग बैठकीत हजर राहणार नाही, अशांवर कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली. १५ व्या वित्त आयोगाच्या आलेल्या सुमारे सात कोटी ५० लाख निधीवर सत्ताधारी पक्षाने स्वतःचे वर्चस्व गाजवत अधिकाधिक निधी आपल्याकडे कसा राहील, अशा आखलेल्या डावाला विरोधी पक्षाने कडवा विरोध दर्शविला. त्यामुळे या निधीची समान विभागणी न करता पाच सभापतींनी सुमारे २० लाख रुपये, तर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना प्रत्येकी सात लाखांची कामे सुचवण्याच्या प्रयत्नाला कडाडून विरोध झाला. निधीचे समान वाटप करावे, अन्यथा सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकू, असा पवित्रा विरोधी पक्षनेत्या सुरेखा थेतले यांनी घेतला. यावर जोरदार खडाजंगी झाल्यावर यामध्ये समन्वय साधत तीन लाखांऐवजी पाच लाखांचा निधी विरोधकांना देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

शासकीय निधीचा अपहार करण्याच्या प्रकरणात अग्रेसर असणाऱ्या विक्रमगड तालुक्यातील ११ अंगणवाड्यांची बांधकामे न करता परस्पर पैसे काढण्याचा प्रकार सभेत गाजला. या प्रकरणाची चौकशी करून ग्रामसेवक आणि ठेकेदारांवर कडक कारवाईसह सरपंचाच्या अपात्रतेसंबंधीच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने सदस्यांनी तत्काळ कारवाईची मागणी केली. जि.पच्या सुरुवातीपासून अनधिकृत शाळांवर कारवाईचा मुद्दा उपस्थित केला जात असला, तरी त्यावर आजपर्यंत कारवाई होत नसल्याने या मुद्द्यावरही चर्चा होत कारवाईची मागणी करण्यात आली.

वाढवण बंदराला सर्वांचाच विरोधवाढवण बंदराविरोधात ठराव घेण्याची मागणी शिवसेना गटनेते जयेंद्र दुबळा यांनी केल्यानंतर सर्वांनी बंदराला आपला विरोध दर्शविला. जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागांतील रुग्णांना वेळेवर वाहने उपलब्ध होत नसल्याने मृत्यूला सामोरे जावे लागत असल्याची बाब निदर्शनास आल्यावर उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी २५ प्राथमिक आरोग्य केंद्रांना २५ रुग्णवाहिका भेट दिल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी घेण्यात आला.