शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाधिकारी सानप यांच्यावर कारवाई होणार?, रवींद्र फाटकांचे आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 01:31 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी लता सानप यांच्याविरोधात आ. रवींद्र फाटक यांनी विशेष उल्लेखाद्वारे विधान परिषदेत केलेल्या तक्रारीची दखल शिक्षणमंत्र्यांकडून घेतली जात असल्याने शिक्षणाधिकारी चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत.

- हितेन नाईक पालघर  - कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करणे, निवृत्त शिक्षकांना वेळच्या वेळी पेन्शन न देणे, बेकायदेशीरपणे नियुक्त्या देणे आदी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी लता सानप यांच्याविरोधात आ. रवींद्र फाटक यांनी विशेष उल्लेखाद्वारे विधान परिषदेत केलेल्या तक्रारीची दखल शिक्षणमंत्र्यांकडून घेतली जात असल्याने शिक्षणाधिकारी चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत.पालघर जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासूनच शिक्षण विभाग भ्रष्टाचाराचे कुरण बनला असून या खात्यातील भ्रष्टाचाराला वेसण घालण्याचे प्रयत्न तत्कालीन उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती नीलेश सांबरे यांनी काही प्रमाणात सुरू केले होते. ज्या शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात बेकायदेशीररीत्या नियुक्त्या, बदलीमध्ये आर्थिक व्यवहार आदी आरोप होत आंदोलने झाली होती, त्यांच्या बदलीनंतर काही कालावधीत त्यांनी पुन्हा आपली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात बदली करून घेत भ्रष्टाचाराची साखळी किती घट्ट आहे, हे दाखवून दिले होते. सध्या विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी लता सानप आता एका वेगळ्या प्रकरणात अडकल्या असून हे प्रकरण त्यांना चांगलेच भोवणार असल्याचे दिसून येत आहे.शिक्षणाधिकारी लता सानप यांनी कामात कसूर केल्याचे आक्षेप आ. फाटक यांनी विधान परिषदेच्या अधिवेशनात घेतले होते. सानप यांच्या बेजबाबदारपणामुळे पालघर जिल्ह्याचे शैक्षणिक नुकसान होत असल्याबाबतचा मुद्दा फाटक यांनी विधान परिषदेच्या अधिवेशनात ४ मार्च रोजी उपस्थित केला होता. शिक्षण विभागाने तत्काळ या प्रकरणाची  चौकशी करून पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.दरम्यान, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाने शालेय शिक्षण विभागाचे सचिव, प्रधान सचिव यांना आ. फाटक यांच्या पत्राचा संदर्भ देऊन या सूचनेवर तत्काळ कारवाई करण्यासंदर्भात आदेशित केले आहे. विधानमंडळ सचिवालयाच्या कक्ष अधिकारी यांनीही सभागृहात सूचना उपस्थित केल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत संबंधित मंत्र्यांनी त्याविषयीचे उत्तर फाटक यांना देणे अपेक्षित असल्याचे कळविले आहे. पालघरच्या प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी लता सानप यांनी कामात कसूर केल्याप्रकरणी  आमदार रवींद्र फाटक यांनी विधानपरिषदेच्या अधिवेशनात त्यावर आक्षेप घेतले होते. तसेच आमदार फाटक यांनी उपस्थित केलेल्या सूचनांचे पालघरच्या काही जिल्हा परिषद सदस्यांनी स्वागत केले आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी लता सानप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रpalgharपालघर