शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

नाव-नंबर नसलेल्या बोटींवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 00:22 IST

घातपातासाठी होऊ शकतो वापर; पोलीस अधीक्षक पाठवणार पत्र

- हितेन नाईकपालघर : खानिवडे आणि खार्डी किनाऱ्यावर बेकायदेशीररीत्या रेती उत्खनन करणाºया २३० बोटींवर पालघर पोलीस अधीक्षकांनी कारवाई केली होती. यातील एकाही बोटीवर नाव आणि नंबर नसल्याने या बोटींचा देशविघातक कार्यासाठी वापर होण्याची शक्यता पाहता महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने अशा नाव-नंबर नसलेल्या बोटींवर मरिन अ‍ॅक्टनुसार कारवाई करावी, यासाठी पोलीस अधीक्षक पत्रव्यवहार करणार आहेत.जिल्ह्यातील वसई तालुक्यातील खानिवडे, नारिंगी, बहाडोली, मुरबे आदी भागात मोठ्या प्रमाणात चोरट्या पद्धतीने रेती उत्खनन केले जात असून लोखंडी आणि फायबर बोटींचा वापर यासाठी केला जातो. सुमारे दीड ते दोन हजार बोटींचा वापर यासाठी केला जात असून या बोटींची नोंद महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या बांद्रा कार्यालयातून केली जात आहे. मात्र या बोटींपैकी बहुतांशी बोटींची नोंद केलीच जात नसल्याची माहिती समोर येत असून जिल्ह्यातील सातपाटी, नवापूर, तारापूर, केळवे, दातीवरे, डहाणू, अर्नाळा, वसई आदी भागात बांधण्यात आलेली मेरिटाइम बोर्डाची कार्यालये नावापुरती असून या कार्यालयात नियुक्त अधिकारी उपस्थित राहात नसल्याने या कार्यालयांना नेहमीच कुलूप लावलेले आढळून येत आहे. बोटीवर नाव आणि नंबर नसल्यास कारवाई करण्याचे अधिकार त्या त्या भागातील बंदर अधिकाºयाला असतानाही बोटीवर कारवाई केली जात नसल्याचे दिसून आले आहे.पाणजू बेटाजवळ दोन वर्षांपूर्वी रेती उत्खनन करण्याच्या नावाखाली गेलेल्या बोटीवर डहाणू कोस्ट गार्डच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली होती. त्या वेळी परप्रांतातल्या कामगारांना अटक करण्यात आली होती.या कारवाईदरम्यान अनेक कामगारांनी समुद्रात उड्या मारून तिवरांच्या जंगलाचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. इतकी गंभीर घटना घडल्यानंतर आजही रेती उत्खनन करणाºया बोटींवर नाव नंबर टाकले जात नसल्याचे पोलीस अधीक्षकांनी टाकलेल्या धाडीदरम्यान दिसून आले होते. आजही या बोटीत कार्यरत कामगार हे परप्रांतातले असल्याने एखादी घातपाताची घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न पोलीस अधीक्षकांना पत्रकार परिषदेत विचारला गेला असता यासंदर्भात महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या अधिकाºयांना कारवाईबाबत कळविण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.नाव, नंबर नसलेल्या बोटीवर मरिन अ‍ॅक्टनुसार महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने कारवाई करावी, यासाठी पत्रव्यवहार करण्यातयेईल.- दत्तात्रेय शिंदे, पोलीस अधीक्षक, पालघर