पारोळ : सर्वोच्च न्यायालयात आदेशानुसार बालयोगी सदानंद महाराज यांच्या तुंगारेश्वर पर्वतावरील आश्रमावर २ हजार पोलीस बंदोबस्त घेऊन आश्रमाच्या इमारती वर गुरु वारी तोडक कारवाई केल्याने भक्तांनी संताप व्यक्त करून मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसई फाटा, सातीवली या ठिकाणी रास्ता रोको करत खानिवडे येथे महामार्गावर टायर जाळले.
मंगळवारपासून कारवाईसाठी तुंगारेश्वर पर्वतावर दाखल झालेल्या फौजफाट्याने पर्वतावर संचारबंदी लागू केल्याने भाविकांना पर्वतावर जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. २ हजार पोलिसांचा फौजफाटा वाढवून त्यात बुधवारी आणखी दोन हजारांची कुमक वाढवण्यात आली. बुधवारी आश्रमावर कारवाई होईल.असे असताना गुरुवारी कारवाई ला सुरु वात करून या आश्रमाचा भक्त निवास तोडला. पर्यावरणवादी देबी गोयंका यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने तुंगारेश्वर आश्रम जमिनदोस्त करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले होते. या आदेशानंतर कारवाई सुरू झाली तरीही भजन कीर्तन व चक्र ी उपोषण भक्तांनी चालू ठेवले पण प्रशासनाने ही कारवाई केल्याने भक्तांमध्ये संताप होता. याबाबत लोकप्रतिनिधी मात्र मौन बाळगून होते.