शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय अनधिकृत ठरवून पालिकेकडून कारवाई

By admin | Updated: September 8, 2016 02:10 IST

वसई-विरार पालिकेने पे अ‍ॅण्ड यूज तत्त्वावर एका संस्थेला पेल्हार येथे दिलेले शौचालय बांधण्याचे काम पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर असतानाच त्यावर कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

वसई : वसई-विरार पालिकेने पे अ‍ॅण्ड यूज तत्त्वावर एका संस्थेला पेल्हार येथे दिलेले शौचालय बांधण्याचे काम पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर असतानाच त्यावर कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेने धानीव-पेलहार प्रभाग क्षेत्रातील वसईफाटा येथे पे अ‍ॅण्ड यूज तत्त्वावर बापा सीताराम जनसेवा महिला मंडळाला सुलभ शौचालय बांधण्याची परवानगी देण्यात आली होती. सदर सुलभ शौचालयाचे भूमिपूजन प्रभाग एफचे सभापती अब्दुल हक्क पटेल, नगरसेविका अंजली पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. या वेळी पालिकेचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उद्घाटनानंतर शौचालयाच्या कामाला सुरुवात झाली. संस्थेने केलेले बांधकाम जवळजवळ पूर्णत्वास आले असताना अचानक थांबवण्यात आले. त्यानंतर, अचानक शौचालयाचे केलेले बांधकाम तोडून टाकण्याचा आदेश प्रभारी सहायक आयुक्त राजेंद्र पाटील अभियंता कल्पेश पाटील यांना देताच त्यांनी अनधिकृत बांधकामविरोधी पथकाचे अधिकारी, कर्मचारी यांना घेऊन शौचालयाचे बांधकाम जेसीबीच्या मदतीने तोडले.विशेष म्हणजे शौचालयाचे बांधकाम तोडण्यासाठी पालिकेने मोठाफौजफाटा आणला होता. ठेका अभियंता कल्पेश पाटील यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, सदर संस्थेने चुकीचे काम केले म्हणून तोडण्यात आले, अशी माहितीठेका अभियंता कल्पेश पाटील यांनी मनसेच्या तालुकाध्यक्ष जे. पाटील यांनी दिली. त्यावर पाटील यांनी, तुम्हीच बांधकामावर देखरेख करीत होते ना, मग चुकीचे बांधकाम कसे केले गेले आणि जेसीबीच्या मदतीने तोडण्याची आवश्यकता काय व एवढे कर्मचारी कशाला? शौचालय अनधिकृत होते काय? असा प्रश्न विचारला असता अभियंता पाटील यांनी उत्तर देण्याचे टाळले. (प्रतिनिधी)