शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पर्ससीननेट बंदीबाबतच्या बैठकीत हाणामारी

By admin | Updated: October 17, 2015 23:30 IST

पर्ससीन नेट मासेमारीमुळे समुद्रातील जैवविविधतेसह मत्स्यसंपदा संपुष्टात येत असल्याने मत्स्य व्यवसायासाठी विनाशकारी ठरलेली ही मासेमारी कायमस्वरुपी बंद करावी असा ठराव

- हितेन नाईक,  पालघरपर्ससीन नेट मासेमारीमुळे समुद्रातील जैवविविधतेसह मत्स्यसंपदा संपुष्टात येत असल्याने मत्स्य व्यवसायासाठी विनाशकारी ठरलेली ही मासेमारी कायमस्वरुपी बंद करावी असा ठराव बहुमताने महाराष्ट्र व गुजरात राज्यातील मच्छिमारांच्या प्रतिनिधीच्या बैठकीत मांडला जात असताना मूठभर पर्ससीन नेट धारकांनी याला विरोध दर्शवीत हाणामारीला सुरुवात केली. पोलिसांनी या प्रकरणी काही पर्ससीन धारकांना ताब्यात घेतल्याची माहिती महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे चिटणीस रामकृष्ण तांडेल यांनी दिली.समुद्रात ज्या पद्धतीने अपरीमीत मासेमारी सुरु आहे. ते पाहता सन २०२६ पर्यंत समुद्रामध्ये एकही मासा शिल्लक राहणार नसल्याचा इशारा सागरी मत्स्य संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी दिला आहे. समुद्रातील जैवविविधता व मत्स्यसंपदा संपुष्टात आणण्यासाठी ट्रॉलर्स व पर्ससीन नेटद्वारे करण्यात येणारी अमर्याद मासेमारी मुख्यत्वे कारणीभूत असल्याचा अहवालही त्यांनी शासनाकडे दिला आहे. अशावेळी ती वाचवून त्याचा समतोल राखण्याच्या दृष्टीने मर्ससीन नेटधारकावर अंकुश लावण्याऐवजी राज्य व केंद्रशासन एनसीडीसी योजनेंतर्गत या नौकाधारकांना अनुदान तत्वावर कर्ज कर्ज देऊन त्यांना उत्तेजन देत असल्याचा आरोप मच्छिमारांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे पर्ससीन नेटधारक मालकांकडे आज ८ ते १० ट्रॉलर्स आहेत.विनाशकारी पर्ससीन धारकांवर अंकुश ठेवून त्याद्वारे होणारी मासेमारी पूर्णत: बंद करावी यासाठी आज दमण येथे अखिल गुजरात मच्छिमार महामंडळ यांनी गुजरात राज्यातील जाफराबाद, दिव, दमण, मँगलोर, नवाबंदर, वेरावळ, उमरसाड, झाई येथील मच्छिमार प्रतिनिधी व पालघर, ठाणे, मुंबई येथील मच्छिमार प्रतिनिधी यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी गुजरातचे माजी खासदार गोपालभाई टंडेल, भागुभाई सोलंकी, मच्छिमार कृतीसमितीचे सरचिटणीस नरेंद्र पाटील, रामकृष्ण तांडेल, जिल्हाध्यक्ष राजन मेहेर, मुंबई जिल्हाध्यक्ष किरण कोळी, जयप्रकाश मेहेर, सुरेश म्हात्रे, गणेश तांडे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने प्रतिनिधी उपस्थित होते. यामुळे पारंपारीक पद्धतीने मच्छिमारी करणाऱ्या बांधवात संताप धुमसतो आहे.