शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा कोळंबी प्रकल्पांवर दुसऱ्या दिवशीही कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 01:07 IST

१८ प्रकल्प उद्ध्वस्त : महसूल व पालिका प्रशासनाला यश

लोकमत न्यूज नेटवर्क वसई : वसईच्या भुईगाव खारटण भागातील पाणथळ जमिनीवर वसई महसूल विभागाच्या आशीर्वादाने अनधिकृतपणे उभे असलेल्या कोळंबी प्रकल्पावर बुधवारी कारवाई करण्यात आली. ही कारवाई गुरुवारीदेखील सुरूच असून कोकण आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार येथील १८ कोळंबी प्रकल्प संपूर्ण उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती वसई तहसीलदार उज्ज्वला भगत यांनी लोकमतला दिली.भुईगाव पश्चिम पट्ट्यातील सर्व्हे नंबर २२० या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या बऱ्याच जमिनी आहेत.  मात्र येथील ५०० हेक्टरहून अधिक जमिनी भूमाफियांच्या ताब्यात आहेत आणि यातील काही सर्व्हे क्रमांक असलेल्या पाणथळ जागेवर धनदांडग्यांनी कोळंबी प्रकल्प टाकले होते. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी आधीच तक्रार दाखल झालेल्या व मुंबई हायकोर्टाने आदेश करीत कोकण आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिल्यावर दोन दिवसांत  झालेल्या या कारवाईत १८ कोळंबी प्रकल्प जमीनदोस्त करण्यात आले आहेत. यासाठी मागील दोन दिवस पोलीस ताफा, ३० बुलडोझर, ट्रॅक्टर, अग्निशामक दल आदी फाटा भुईगावात कारवाई ठिकाणी सज्ज होता. राज्य शासनाने सदर कोळंबी प्रकल्प तोडण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. त्याचा अहवाल सादर होताच कोकण आयुक्त यांच्या आदेशानुसार या ठिकाणी तोडक कारवाईचे आदेश यापूर्वीच वसई महसूल व महापालिका प्रशासनास दिले. त्यानुसार बुधवार व गुरुवारी दिवसभर ही कारवाई करण्यात आली. वसई महसूल विभागाचे प्रांत स्वप्निल तांगडे, तहसीलदार उज्ज्वला भगत आणि वसई विरार महापालिका प्रशासन यांच्या नगररचना विभाग तसेच पोलीस विभाग यांनी मिळून कारवाई केली. पर्यावरण संवर्धन समितीचे समीर वर्तक, फ्रान्सिस डिसोझा,  मॅकेन्झी डाबरे व पर्यावरण संवर्धन समिती कार्यकर्ते यांनी ही कारवाई शासनाच्या वतीने होण्यासाठी आतापर्यंत भुईगाव व पश्चिम पट्टीतील गावकऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आता या दोन दिवसांत संपूर्ण पाणथळ जमीन सरकारने मोकळी केल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त करीत शासनाचे आभारही मानले आहेत.आज मी थोडा मोकळा श्वास घेईन गाव व खेड्यात झालेले अतिक्रमण हे शहरावर प्रभाव टाकत असते व असे प्रकार हे पर्यावरणाचे नुकसान करत असतात. त्यात पर्यावरणाचा विषय हा आज  जागतिक पातळीवर गंभीर झाला असताना वसईतील ही तोडक कारवाई शासन व न्यायालयाच्या आदेशानुसार होत आहे. त्याबाबत अभिनंदन. मी खूप आनंदी आहे, नक्कीच पर्यावरण संवर्धन समिती वसई उत्तम प्रकारे आपले कार्य व जबाबदारी सांभाळत आहे.- फादर फ्रान्सिस दिब्रिटो, ज्येष्ठ साहित्यिक, संस्थापक पर्यावरण संवर्धन समिती