शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन स्टँडविरोधात कारवाई होणार, नालासोपारा स्टँडमधील अवैध पार्किंगविरोधात मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 02:17 IST

अवघ्या दोन दिवसांसाठी दिलेल्या जागेवर महापालिकेच्या परिवहन सेवेने उभारलेल्या बस स्टँडच्या विरोधात एसटी महामंडळ कारवाई करणार आहे.

शशी करपेवसई : अवघ्या दोन दिवसांसाठी दिलेल्या जागेवर महापालिकेच्या परिवहन सेवेने उभारलेल्या बस स्टँडच्या विरोधात एसटी महामंडळ कारवाई करणार आहे. त्याचबरोबर नालासोपारा एसटी स्टँडमधील बेकायदा पार्किंगवर पोलिसांच्या मदतीने कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. तर मुंबई हायकोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी जनआंदोलन समिती एसटी आणि परिवहन सेवेविरोधात अवमान याचिका दाखल करणार आहे.नालासोपारा एसटी स्टँडमध्ये सध्या खाजगी व चारचाकी वाहनांनी बेकायदा पार्किंग सुरु केले आहे. त्यातच रिक्शा चालकांनी अतिक्रमण करून बेकायदा स्टँड तयार केला आहे. गेल्या आठवड्यात रिक्शांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलीसांना एका रिक्षा चालकाने धक्काबुक्की केली होती. ही कमी म्हणून की काय आता तर वसई विरार महापालिकेच्या परिवहन विभागाने चक्क बस स्टँड तयार केले आहे.एसटी स्टँडच्या दोनशे मीटर परिसरात खाजगी प्रवासी वाहनांना प्रवेश करण्यास कायद्याने बंदी आहे. मात्र, स्थानिक अधिकाºयांनीच कायदा मोडीत काढला आहे. या बेकायका पार्किंगविरोधात एसटीचे स्थानिक अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे पालघर विभागीय नियंत्रक अजित गायकवाड यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे. स्टँडमधील बेकायदा पार्किंगवर कारवाई करण्यासाठी त्यांनी पोलिसांची मदत मागितली आहे. वसईचे अपर पोलीस अधिक्षक राजतिलक रोशन यांच्या समवेत त्यांनी बैठक घेऊन ही मागणी केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच स्टँडमधील पार्किंग हटवण्याची कार्यवाही सुरु होणार आहे. आता ही कार्यवाही प्रत्यक्षात कधी आणि कशी सुरू होते याकडे संपूर्ण वसई, विरारकरांचे लक्ष लागून राहिलेलआहे.अवमान याचिका दाखल होणार-प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी आणि परिवहन सेवेने सेवा द्यावी असे स्पष्ट निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. मात्र, एसटीने काही शालेय प्रवासी सेवा वगळता १३ डिसेंबरपासून वसई आणि नालासोपारा एसटी डेपोतील शहरी वाहतूक बंद केली आहे. नालासोपारा डेपोतून सत्पाळा मार्गे राजोडी उमराळे हीच एसटी सुरु ठेवली आहे. तर वसई डेपोतून फक्त रानगाव एसटी सुरु ठेवण्यात आलेली आहे. दुसरीकडे, एसटी प्रमाणे रेल्वेच्या वेळापत्रकानुसार बस सेवा देण्यात महापालिकेची परिवहन सेवा अपयशी ठरली आहे.एसटी पहाटेच्या पहिल्या लोकलपासून शेवटच्या लोकलपर्यंत बस सेवा देत होती. पण, महापालिकेच्या बहुतांश सेवा रात्री दहाच्या सुमारास बंद होत आहेत. तर पहाटे सहानंतरच सेवा सुरु केल्या जातात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचा आरोप जनआंदोलन समितीच्या कार्याध्यक्षा व याचिकाकर्त्या डॉमणिका डाबरे यांनी केला आहे. एसटी आणि परिवहन सेवेने मुंबई हायकोर्टाच्या आदेशाचे पालन केले नसल्याने त्यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल केली जाणार आहे, असे डाबरे यांनी सांगितले.