शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

अवैध रेती वाहतुकी विरोधात कारवाई

By admin | Updated: November 18, 2015 00:08 IST

अवैध रेती वाहतूक महाराष्ट्र राज्यामध्ये बंद असली तरी विना परवाने वाहतूक करणाऱ्यांकडून महसुल विभाग लाखो रू. दंड वसूल करते. मात्र मनोर परिसरात गैरमार्गे रेती

मनोर : अवैध रेती वाहतूक महाराष्ट्र राज्यामध्ये बंद असली तरी विना परवाने वाहतूक करणाऱ्यांकडून महसुल विभाग लाखो रू. दंड वसूल करते. मात्र मनोर परिसरात गैरमार्गे रेती आणून राजरोसपणे बिल्डरांच्या नवीन इमारतींच्या कामाला सूट कशी दिली जाते? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या आठवड्यात मुंबई-अहमदाबाद महामार्गे जाणाऱ्या रेतीचे १२ कंटेनर बेलपाडा येथे पकडून २५ ते ३० लाख रू. दंड वसूल केले परंतु तेच महसूल विभागाचे कर्मचारी मनोर गावात मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अनेक गावात हॉटेल व बिल्डींग बांधण्याच्या कामाकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्या बिल्डींग हॉटेलसाठी रेती कुठून येते त्यांच्यावर का कारवाई होत नाही तेही तपासणे महत्वाचे आहे. तलाठ्यांचा त्यांच्या डोक्यावर हात आहे का? मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनर मध्ये दडवलेली वाळू शोधून पकडली जाते आणि तेथे उघडउघड वापरली जाणारी रेती आली कुठून? याचा शोध महसूल कर्मचारी का घेत नाही? झालेले बांधकाम व त्यासाठी वापरल्या गेलेल्या रेतीचे प्रमाण याचा लेखाजोखा मांडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई का होत नाही? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. परंतु त्याचे उत्तर देण्याची तसदी कोणालाच घ्यावीशी वाटत नाही.दहीसर, हलोली, बहाडोळी, विश्रामपूर, नावझे, वारगाव अशी अनेक रेती बंदरे महसूल खात्याने बंद केली आहेत. तेथील रेती परवाने बंद केले आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील भूमीपुत्रांवर अन्याय झाला आहे. ते कर्जबाजारी झाले आहेत. वाहनांसाठी घेतलेले कर्ज फेडू शकले नाही म्हणून वाहने बँकांनी जप्त केली आहेत. जगण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. एकीकडे भूमीपुत्र त्यांच्या हक्काच्या रोजीरोटीपासून वंचित राहत आहेत. मात्र बिल्डर्स लॉबीच्या नवीन इमारतींची कामे गैरमार्गाच्या रेतीपासून राजरोसपणे सुरू आहेत.