शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण मोहिमेचा वाढला वेग, पालघर जिल्ह्यात आणखी १७ केंद्रे वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 09:26 IST

जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार ६८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. नागरिकांनी जास्तीतजास्त केंद्रे वाढवून मिळावीत, अशी मागणी केल्यावरून १७ ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.  

हितेन नाईक - 

पालघर: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लसीकरण केंद्रांवर होत असलेली गर्दी तसेच नागरिकांकडून लसीकरणाची होत असलेली मागणी लक्षात घेता जिल्ह्यात आणखी १७ केंद्रांची वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार ६८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. नागरिकांनी जास्तीतजास्त केंद्रे वाढवून मिळावीत, अशी मागणी केल्यावरून १७ ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.   जिल्ह्यात ४५ ते ५९ वर्षांदरम्यानच्या व्याधीग्रस्त १२ हजार ९६४ नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे, तर तर ६० वर्षांवरील ४६ हजार ३४८ नागरिकांचा लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. तर दुसरा डोस १० हजार ७२० नागरिकांना देण्यात आला आहे. 

जिल्ह्यात ५७,०६८ लोकांनी घेतली लसजिल्ह्यात शासकीय रुग्णालयाद्वारे ४५ ते ६० वर्षांतील  ३ हजार २३३ नागरिकांचा पहिला डोस तर ६० वर्षांवरील १२ हजार ९६४ नागरिकांचा पहिला डोस पूर्ण करण्यात आला आहे. खासगी रुग्णालयात ४५ ते ६० वर्षांआतील १ हजार १४७  जणांचे लसीकरण तर ६० वर्षांवरील ३ हजार ९५९ लसीकरण  पूर्ण झाले आहे. खाजगी रुग्णालयात ५ हजार २३८ जणांना पहिला डोस देण्यात आला आहे, तर ४० जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण ४६ हजार ३४८ नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे, तर १० हजार ७२० नागरिकांना दुसरा डोस घेण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार ६८ लोकांचे लसीकरण झालेले आहे. 

सुरू झालेली नवीन लसीकरण केंद्रेपालघर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात, तलासरी तालुक्यात आमगाव येथे, वसई तालुक्यात कामण  येथील प्रा. आ. केंद्रामध्ये लसीकरण सुरू करण्यात आले आहे. तसेच वसई तालुक्यातील भाताणे प्रा. आ. केंद्र, डहाणू तालुक्यात घोलवड, गंजाड प्रा. आ. केंद्र व देहर्णे उपकेंद्र, पालघर तालुक्यातील सफाळा व सोमटा प्रा. आ. केंद्र, वसई तालुक्यातील निर्मळ व आगाशी येथील प्रा. आ. केंद्र, मोखाडा तालुक्यातील खोडाळा व मोखाडा येथील प्रा. आ. केंद्र व जव्हार तालुक्यातील ४ प्रा. आ. केंद्रांत पुढील आठवड्यापासून लसीकरणाची जोरदार मोहीम राबविण्यात येणार आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याpalgharपालघरVasai Virarवसई विरार