शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणकारी कंपन्यांना अभय? प्रांत म्हणतात, ‘मी टेक्निकल अ‍ॅथॉरिटी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 02:48 IST

तालुक्यातील अबिटघर गावातील कारखान्यांच्या घातक प्रदूषणामुळे स्थानिकांचे आरोग्यच धोक्यात आले असताना गुरु वारी उपविभागीय अधिका-यांच्या कार्यालयात झालेल्या सुनावणीत होणारे प्रदुषण घातक नसल्याचा अहवाल अधिका-यांनी दिल्याने या प्रदूषणकारी कारखान्यांना ते अभय देतात की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

- वसंत भोईरवाडा : तालुक्यातील अबिटघर गावातील कारखान्यांच्या घातक प्रदूषणामुळे स्थानिकांचे आरोग्यच धोक्यात आले असताना गुरु वारी उपविभागीय अधिका-यांच्या कार्यालयात झालेल्या सुनावणीत होणारे प्रदुषण घातक नसल्याचा अहवाल अधिका-यांनी दिल्याने या प्रदूषणकारी कारखान्यांना ते अभय देतात की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर सुनावणी घेणाºया उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर यांनी आपण टेक्निकल अ‍ॅथॉरिटी नसल्याने ठोस कारवाई करता येत नसल्याचे सांगून कारवाईबाबत कानावर हात ठेवले आहेत.लोकमतने ‘आबिटघर गाव घातक प्रदूषणाच्या विळख्यात’ या मथळ्याखाली दि. ११ फेब्रुवारी रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर कारखानदार व अधिकाºयांचे चांगलेच धाबे दणाणले होते. यानंतर ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींसंदर्भात वाड्याच्या उपविभागीय अधिकाºयांनी गुरुवारी (दि. १५) सुनावणी घेतली. मात्र या सुनावणी दरम्यान उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सुजित डोलम यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे प्रशासन ह्या घातक प्रदुषणकारी कारखान्यांना अभय देत असल्याचा आरोप तक्रारदार विश्वास पाटील व आदिवासी ग्रामस्थांनी केला आहे.सुनावणीप्रसंगी तक्रारदार विश्वास पाटील यांनी ठाम भूमिका घेत कारखान्यांमुळे होणाºया प्रदूषणामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे सांगितले. त्याला उपस्थित गावकºयांनीही दुजोरा दिला.मात्र, डोलम यांनी सादर केलेल्या अहवालात कारखान्यांकडून होणारे प्रदूषण हे घातक नसल्याचा निर्वाळा दिल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. यामुळे प्रशासनाने सुनावणी घेऊन प्रदूषणाविरोधात सुरु केलेली कारवाई ही केवळ फार्स ठरण्याचीच शक्यता अधिक निर्माण झाली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी करावी, अशी मागणी होते आहे.प्रदूषणकारी कारखान्यांना यापूर्वी वारंवार नोटीस बजावून सुधारणा करावयास सांगितले आहे. सद्यस्थितीत असलेली प्रदूषणाची पातळी घातक नसल्याने कारखाने बंद करण्याची कारवाई करता येत नाही.- सुजित डोलम, प्रदूषण नियंत्रण अधिकारी, कल्याणप्रदूषणासंदर्भात टेक्निकल अ‍ॅथॉरिटी ही प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे. आपण या परिसराची पहाणी करणार आहोत. परंतु कारवाईचे अधिकार देखील प्रदूषण नियंत्रण मंडळाला असल्याने यासंदर्भात त्यांनीच निर्णय घ्यायचा आहे.- मोहन नळदकर,उपविभागीय अधिकारी, वाडाप्रदुषणकारी कारखान्यांना प्रशासन पाठीशी घालेल याची भीती आहेच. स्थानिकांच्या आरोग्यासाठी प्रदूषणाविरोधात आम्ही आमची लढाई सुरु ठेवू.-विश्वास पाटील, तक्र ारदार

टॅग्स :Vasai Virarवसई विरार