शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

लोकांचे पैसे देणे टाळण्यासाठी केलेला अपहरणाचा बनाव उधळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 23:37 IST

वालीव पोलिसांचे यश : ‘त्या’ व्यक्तीवर गुन्हा दाखल करणार

नालासाेपारा : बँकेत चेक टाकण्यासाठी गेलेल्या ५५ वर्षीय वडिलांचे कोणी अपहरण केले असल्याचा गुन्हा वालीव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता, पण अपहरण झालेली व्यक्ती पोलिसांना सापडल्यावर धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अपहरण झालेल्या व्यक्तीने अनेक नागरिकांकडून लाखो रुपये घेतले आहे. ते घेतलेले पैसे परत देण्याचे टाळण्यासाठी अपहरण झाल्याचा बनाव करण्यात आला होता. वालीव पोलिसांनी गुजरात राज्यातून सदर व्यक्तीला आणले आहे.विरारच्या खानीवडे येथील हनुमाननगरमध्ये राहणारे रामसजीवन पाल (५५) हे १८ जानेवारीला दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पेल्हार येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत चेक टाकण्यासाठी गेले होते. तेव्हापासून ते घरी परतले नाहीत, म्हणून घरच्यांनी आजूबाजूला शोध घेतला, पण ते सापडले नाहीत. शेवटी १९ जानेवारीला त्यांचा मुलगा रामराज पाल (२८) याने वालीव पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत, अनेक पोलीस ठाण्यात फोटो व माहिती पाठवून याचा काही पत्ता मिळतो का, याचा शोध घेण्यास सुरुवात केली. वालीवचे गुन्हे प्रकटीकरण शाखेची टीम सर्व ठिकाणी, तसेच अनेक पोलीस ठाण्यात जाऊन काही थांगपत्ता लागतो का, याचा शोध घेत तपास करत होते. नाशिक, ठाणे, पुणे, पालघर, मुंबई, नवी मुंबई या ठिकाणीही शोध घेतला, पण ते सापडले नाहीत. माहितीच्या आधारे गुजरात राज्यातील वापी या ठिकाणी राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी वापी या ठिकाणी घर भाड्याने घेऊन राहणाऱ्या रामसजीवन पाल याला रविवारी आणले. याने अनेक लोकांकडून लाखो रुपये घेतले असून, तक्रारदार आल्यावर याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करणार असल्याचे वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

टॅग्स :Kidnappingअपहरण