शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींनी रचली अपहरणाची कहाणी; मीरा रोडमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 03:00 IST

एका विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार, शीतलनगर भागात एका खाजगी शाळेत चौथी इयत्तेत शिकणाऱ्या दोन्ही ११ वर्षांच्या विद्यार्थिनी मैत्रिणी आहेत.

मीरा रोड : आई मारते म्हणून निघून गेलेल्या चौथीच्या विद्यार्थिनीने आपल्या मैत्रिणीसोबत पळून विरार गाठले. पण नंतर मात्र दोघींनी बुरखाधारी महिलेसह वाहनचालकाने अपहरण केले, अशी कहाणी रचल्याची घटना मीरा रोडमध्ये घडली.एका विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार, शीतलनगर भागात एका खाजगी शाळेत चौथी इयत्तेत शिकणाऱ्या दोन्ही ११ वर्षांच्या विद्यार्थिनी मैत्रिणी आहेत. बुधवारी सायंकाळी शाळेतून सुटल्या असता होली क्रॉस शाळेसमोरील रस्त्यावर अचानक पांढºया रंगाची गाडी आली. त्यातून एक बुरखाधारी महिला बाहेर आली आणि दोघींना गाडीत बसवले. गाडी चालवणाºयानेही तोंडावर मास्क घातले होते. गाडीची काच बंद असल्याने मदतीसाठी आरडाओरडा करूनही आवाज बाहेर गेला नाही. महिलेने चाकूचा धाक दाखवून ओरडणे बंद करण्याचा दम दिला. त्यामुळे दोघींनी ओरडणे बंद केले.गाडी बरीच पुढे गेली असता संधी साधून एकीने महिलेच्या हाताचा चावा घेतला. तर, दुसरीने गाडीचे दार उघडत दोघी धावल्या. चालकाने पाठलाग केला, परंतु वर्दळ असल्याने तो मागे फिरला. दोघींनी तेथे असलेल्या सरबतविक्रेत्यास विचारणा केली असता त्या विरार पश्चिमेला असल्याचे कळले. सरबतवाल्याकडून मोबाइल घेऊन आईला फोन केला व घडलेला प्रकार सांगितला.विरार पोलीस ठाण्यात फिर्यादीसाठी गेल्यावर तेथील पोलिसांनी त्यांना नयानगर पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. गुरुवारी मुलीच्या फिर्यादीनंतर नयानगर पोलिसांनी बुरखाधारी महिला व चालकाविरोधात गुन्हा दाखल केला.दरम्यान, पोलीस तपासात मात्र अपहरणाचा बनाव असल्याचे निष्पन्न झाले. शाळेत दिलेला अभ्यास झाला नसल्याने घरचे मारतील, या भीतीने दोघींनी शाळा सुटल्यावर थेट विरार गाठले.विरारला त्या लोकलने गेल्याचा संशय आहे. विरार पश्चिमेस सरबतविक्रेत्यास या दोघी मुली दिसल्याने त्याने दोघींची विचारपूस केली. दोघी मुली मीरा रोडच्या असल्याचे कळल्याने त्याने एकीकडून तिच्या आईचा मोबाइल क्रमांक घेऊन दोघी मुली विरारला आपल्याकडे सुखरूप असल्याचे कळविले.तपासात खरे झाले उघडघरचे मारतील म्हणून या दोघींनी अपहरणाची कहाणी रचली असल्याची माहिती सहायक निरीक्षक सुभाष ठाकूर यांनी दिली. मुलींनी आधी अपहरणाची माहिती दिल्याने त्यानुसार गुन्हा दाखल केला होता. पण, तपासात मुलींनी नेमका प्रकार सांगितला. मुली मिळाल्याचे कळताच पालकांनी सुटकेचा निश्वास टाकला. तेही कहाणीने चक्रावून गेले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर