शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

जागेमुळे अंगणवाडीचा तिढा

By admin | Updated: March 31, 2017 05:26 IST

पर्यायी जागेची अट घातल्याने भिनारी शिंगडपाडा येथील अंगणवाडी इमारत बांधणीच्या मुद्यावरून ग्रामस्थ विरूद्ध

बोर्डी : पर्यायी जागेची अट घातल्याने भिनारी शिंगडपाडा येथील अंगणवाडी इमारत बांधणीच्या मुद्यावरून ग्रामस्थ विरूद्ध जमीनमालक हा तिढा वाढला आहे. दरम्यान अंगणवाडी कोणत्या जागेत उभी राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.डहाणू तालुक्यातील जाम्बुगाव ग्रामपंचायतीअंतर्गत भिनारी शिंगडपाडा येथील मोडकळीस आलेल्या अंगणवाडीच्या इमारत नूतनीकरणासाठी निधी मंजूर झाला आहे. प्रत्यक्ष बांधकामाला सुरूवात करण्यापूर्वी जमीनमालक व ग्रामस्थ यामध्ये वाद निर्माण झाला असून ग्रामस्थांना जुन्या जागेवर अंगणवाडी हवी आहे. मात्र, जमिनीच्या वारसदारांची या बाबत हरकत आहे. अंगणवाडीची वादग्रस्त जमीन कै. धीरजलाल जव्हेरचंद्र शहा यांच्या नावे असून मयोद शहा यांच्यासह आणखी आठ वारस आहेत. येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जिल्हा परिषद भिनारी शाळेच्या उभारणीस १९८१ साली धिराजलाल यांनी तोंडी परवानगीने दानपत्र न करता जमीन दिल्याचे मयोद शहा यांचे म्हणणे आहे. सर्व्हे नं. ४०३ व ४०५ या जमिनीवर अतिक्रमण करून बोअरवेल आणि समाजमंदिर बांधण्यात आले असून ग्रामपंचायतीने जमीनमालकाची परवानगी घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित जमिनीवर अंगणवाडी इमारत बांधण्याचा अट्टाहास असेल, तर शहा कुटुंबाची याबाबत हरकत आहे. मात्र, अन्य ठिकाणी मालकीच्या जागेत अंगणवाडीला विनामूल्य जमीन देण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.(वार्ताहर)‘१९८१ साली वडिलांनी शाळेसाठी जमीन देताना तोंडी परवानगी दिली होती. मात्र, दानपत्र केले नव्हते. विवादित जागे व्यतिरिक्त अंगणवाडीकरिता मालकीची अन्य जागा विनामूल्य उपलब्ध करण्यास तयार आहोत’- मयोद शहा (तक्र ारदार)