शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

युरोपमध्ये नोकरीसाठी गेलेल्या पालघरच्या तरुणाची फसवणूक; भारतात आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 11:44 IST

पालघर : अल्बानिया (युरोप) येथे अडकलेल्या पालघरच्या  उमेश किशन धोडी यांची कामानिमित्त तेथे जाऊन फसवणूक झाली. उमेश यांनी सोशल ...

पालघर : अल्बानिया (युरोप) येथे अडकलेल्या पालघरच्या  उमेश किशन धोडी यांची कामानिमित्त तेथे जाऊन फसवणूक झाली. उमेश यांनी सोशल मीडियाद्वारे केंद्राकडे केलेल्या मदतीच्या हाकेला पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी तत्काळ प्रतिसाद दिला आहे. खासदारांनी परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर यांची भेट घेत त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू करण्याची मागणी केली.

पालघरचे रहिवासी उमेश धोडी हे अल्बानिया (युरोप) येथे नोकरीनिमित्त गेल्यानंतर फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. या गंभीर प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्यासाठी खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे त्वरित मदतीची मागणी केली आहे. उमेश धोडी यांना वडोदरा येथील एका एजंटमार्फत ‘जनरल हेल्पर’ म्हणून अल्बानियात नोकरीचे आमिष दाखवून पाठवले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्यावर जबरदस्तीने झाडू मारणे आणि अन्य मेहनतीची कामे लादली गेली. त्यानंतर कोणतीही वैध कारणे न देता त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. 

जिवे मारण्याची धमकीसध्या त्याला अन्न, निवास आणि वैद्यकीय मदतीसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात असल्याचे त्याने सोशल मीडियाद्वारे कुटुंबीयांशी संपर्क साधून सांगितले. दिवसेंदिवस त्याची स्थिती गंभीर हाेत असून अल्बानियातील स्थानिक एजंट हे उमेश धोडी याला जिवे मारण्याची धमकी देत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. हेमंत सवरा यांनी सरकारला मदतीसाठी साकडे घातले आहे.   

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरारMumbaiमुंबई