शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून पतीवर गुन्हा दाखल

By धीरज परब | Updated: January 20, 2024 19:25 IST

विकास उर्फ विक्की शेळके याच्याशी ३१ डिसेंबर २०२२ रोजी प्रेमविवाह झाला होता.

मीरारोड: ३१ डिसेंबर २०२२ रोजी प्रेमविवाह झालेल्या विवाहितेने अवघ्या वर्षभरात म्हणजेच ३१ डिसेंबर २०२३ रोजी आत्महत्या करून आयुष्य संपवले. चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण व छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून मुलीच्या वडिलांच्या फिर्यादी वरून जावयावर १७ जानेवारी रोजी भायंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रेमविवाहाच्या ह्या दुर्दैवी अंतबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. 

नांदेडच्या शिवाजी नगर, जयभीम नगर मध्ये राहणाऱ्या सोनल गोडबोले हिचे त्याच भागात राहणाऱ्या विकास उर्फ विक्की शेळके याच्याशी ३१ डिसेंबर २०२२ रोजी प्रेमविवाह झाला होता. विकास याचे आधीच लग्न झालेले होते व पहिल्या पत्नी पासून त्याला तीन मुलं आहेत. परंतु घरच्यांच्या विरोधात जाऊन सोनल हिने प्रेमविवाह केला. परंतु विकास हा सोनलवर चारित्र्याच्या संशयावरून तिला मारहाण करणे, तिच्याशी नेहमी भांडण करणे, तिला मानसिक व शारीरिक त्रास देत असे. दोन महिन्यापूर्वी विकास व सोनल हे सोनलची भाईंदर मध्ये राहणारे बहीण शीतल ढगे कडे राहण्यास आले होते. १५ दिवसांनी विकास हा एकटाच नांदेडला निघून गेला. ३१ डिसेंबर २०२३ च्या पहाटे सोनल हिने बहिणीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.  

१ जानेवारी रोजी नांदेड येथे सोनलवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान शीतलच्या मुलीने, ३० डिसेंबरच्या रात्री उशिरा सोनलचे विकास सोबत मोबाईलवर जोराचे भांडण झाले होते असे सांगितले. त्यानंतर सोनलचे ६५ वर्षीय वडील धोंडीराम गोडबोले यांच्या फिर्यादी वरून भाईंदर पोलिसांनी सोनल हिला मारहाण, छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून पती विकास शेळकेवर गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारmira roadमीरा रोड