शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

डहाणूत १८ ग्रामपंचायतींकडे ९४ लाख पाणीबिल थकीत; पाणीपुरवठा विभागाचे कपातीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 00:45 IST

ग्रामस्थांची वणवण, डहाणूतील सर्वात मोठ्या चिंचणी ग्रामपंचायतीवर ४० लाख रुपये, तर तारापूर ग्रामपंचायतीवर २१ लाख रुपयांची थकबाकी आहे. 

शौकत शेख  डहाणू : पालघर तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील १८ गावे आणि खेड्यापाड्यांना बाडापोखरण प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेंतर्गत साखरे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, येथील ग्रामपंचायतींनी वेळाेवेळी नोटिसा देऊनही दरमहा पाण्याचे बिल भरलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर फेब्रुवारी २०२१ अखेरपर्यंत ९४ लाखांची थकबाकी झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने संबंधित ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा कपात करण्याचे आदेश दिले असून भरउन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकण्याची वेळ आली आहे. 

डहाणूच्या बंदरपट्टी भागातील चिंचणी, तारापूर, वाणगाव, गोवणे, आसनगाव, कोलावली, बावडा, तनाशी, चंडीगाव, वाढवण, वरोर, वासगाव, बाडापोखरण, पोखरण, धाकटी डहाणू, तडियाले, धूमकेत, गुंगवाडा, कापसी इत्यादी गावांना तसेच खेड्यापाड्यांना साखरे धरणातून पाणीपुरवठा केला जातो.  अनेक वर्षांपासून बाडा-पोखरण प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेचे देखभाल-दुरुस्तीचे काम जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे असल्याने संबंधित ग्रामपंचायतीकडून पाणीपट्टीही पाणीपुरवठा विभाग वसूल करत असते. वारंवार सूचना, नोटीस बजावूनही ग्रामपंचायत दरमहा येणारे पाणीबिल भरण्यास चालढकल करत असल्याने या ग्रामपंचायतींवर मोठ्या प्रमाणात थकबाकी झाली आहे. यामध्ये डहाणूतील सर्वात मोठ्या चिंचणी ग्रामपंचायतीवर ४० लाख रुपये, तर तारापूर ग्रामपंचायतीवर २१ लाख रुपयांची थकबाकी आहे. 

वर्षभरापासून कोरोनाच्या महामारीमुळे गाव-शहरांत लाॅकडाऊन झाल्याने अनेकांचे नोकरी-व्यवसाय बंद झाल्याने नागरिकांवर उपासमारीची वेळ आली हाेती. त्यात बहुसंख्य मालमत्ताधारकांनी ग्रामपंचायतीला घरपट्टी, पाणीपट्टी भरली नसल्याने ग्रामपंचायतीच्या तिजोरीतही ठणठणाट आहे. 

बाडापाेखरण याेजनेलाही नाेटीसदरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (वाणगाव) च्या अंतर्गत येत असलेल्या साखरे धरणातून बाडा-पोखरण प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला कच्चा पाणीपुरवठा केला जाताे. त्या पाण्याचे अनेक वर्षांचे दोन कोटींचे बिल बाडा-पोखरण योजनेने भरले नसल्याने प्राधिकरणाने पाणीकपातीची नोटीस दिली आहे.

 

टॅग्स :Waterपाणी