शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

वसई येथील अपघातग्रस्त कुटुंबास ९३ लाखांची भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 05:26 IST

गोखिवरे, वसई (पू.) येथील एव्हरशाईन सिटीमधील कृष्णसागर सोसायटीत राहणारे ३७ वर्षांचे पांडे ३१ आॅक्टोबर २०१२ रोजी रात्री मोटारसायकलने वसई फाट्यावरून वसई स्टेशनकडे जात असताना टँकरने मागून येऊन धडक मारल्याने त्याखाली चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: वळिव नाक्यावरील किचन गार्डन हॉटेलजवळ सात वर्षांपूर्वी झालेल्या रस्ता अपघातात मृत्यू पावलेल्या बिनोद पांडे या व्यावसायिकाच्या कुटुंबास मुंबई उच्च न्यायालयाने सुमारे ९३ लाख रुपयांची भरपाई मंजूर केली आहे. ही भरपाई सन २०१२ पासूनच्या आठ टक्के व्याजासह असल्याने पांडे यांच्या कुटुंबियांना प्रत्यक्षात सुमारे दीड कोटी रुपये मिळतील.

गोखिवरे, वसई (पू.) येथील एव्हरशाईन सिटीमधील कृष्णसागर सोसायटीत राहणारे ३७ वर्षांचे पांडे ३१ आॅक्टोबर २०१२ रोजी रात्री मोटारसायकलने वसई फाट्यावरून वसई स्टेशनकडे जात असताना टँकरने मागून येऊन धडक मारल्याने त्याखाली चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. तो टँकर पेल्हार येथील हकीम हरून खान यांच्या मालकीचा होता व त्याचा विमा युनायटेड इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीने उतरविला होता. या अपघाती मृत्यूबद्दल पांडे यांच्या विधवा पत्नी कुंती व राहुल (१६ वर्षे), अमर (१२) आणि अंजली (८) या मुलांनी केलेल्या दाव्यात वसई येथील मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने ८९.७५ लाख रुपयांची भरपाई मंजूर केली होती. नोटीस काढूनही टँकरमालक किंवा विमा कंपनी हजर न झाल्याने तो दावा एकतर्फी निकाली काढला गेला होता.

भरपाईचा हा निकाल रद्द करून घेण्यासाठी विमा कंपनीने तर भरपाई वाढविण्यासाठी पांडे कुटुंबियांनी अशी दोन अपिले उच्च न्यायालयात दाखल केली गेली होती. न्या. रमेश धानुका यांनी अंतिम सुनावणीनंतर विमा कंपनीचे अपील फेटाळले व पांडे कुटुंबियांचे अपील मंजूर करून भरपाईच्या रकमेत वाढ केली. सज्ञान झाल्यानंतर तिन्ही मुले भरपाईची रक्कम काढून घेऊन तिचा हवा तसा विनियोग करू शकतील.

या अपघातास टँकरचा ड्रायव्हर एकटा जबाबदार नव्हता. पांडे यांचीही त्यात चूक होती. त्यामुळे मुळात त्यांचे कुटुंब भरपाई मिळण्यासच पात्र नाही इथपासून ते भरपाईचा हिशेब चुकीने केला गेला आहे इथपर्यंत अनेक मुद्दे विमा कंपनीने अपिलात मांडले. परंतु ते अमान्य केले गेले.