शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

बडोदा बँकेचे ९ कोटी ६ महिन्यांत फेडेन!वसई विकास सहकारी बँकेचे चेअरमन हेमंत म्हात्रेंची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 00:08 IST

बडोदा बँकेने मालमत्ता जप्तीची कारवाई केल्यामुळे सध्या चर्चेत असलेले वसई विकास सहकारी बँकेचे चेअरमन हेमंत म्हात्रे यांनी बडोदा बँकचे ९ कोटी च्या आसपास असलेले थकीत कर्ज सहा महिन्याच्या आत फेडून टाकेन अशी ग्वाही लोकमतशी बोलतांना दिली.

वसई : बडोदा बँकेने मालमत्ता जप्तीची कारवाई केल्यामुळे सध्या चर्चेत असलेले वसई विकास सहकारी बँकेचे चेअरमन हेमंत म्हात्रे यांनी बडोदा बँकचे ९ कोटी च्या आसपास असलेले थकीत कर्ज सहा महिन्याच्या आत फेडून टाकेन अशी ग्वाही लोकमतशी बोलतांना दिली. याच बँकचे याच शाखेचे ५५ कोटीचे व्यक्तीगत कर्ज मी गेल्याच महिन्यात एक रकमी फेडले, असेही त्यांनी स्पष्ट केले.गुजरातमधील उमरगाव मधील बडोदा बँकेच्या शाखेकडून मी दोन कर्जे घेतली होती यापैैकी ५५ कोटीचे कर्ज हे व्यक्तीगत स्वरूपाचे होते तर ९ कोटीचे कर्ज हे भागीदारीतून साकारलेल्या कंपनीसाठी घेतले होते. या बँकेचे म्हणणे होते की ५५ कोटीचे सगळे कर्ज नील करण्याएैैवजी त्यातल्या काही रकमेतून या ९ कोटीच्या कर्जाची रक्कम भरा परंतु ते शक्य नव्हते कारण कंपनीच्या नावे असलेले कर्ज मी व्यक्तीगत रकमेतून कसा भरू शकत होतो, हे मी बँकेला समजावले तिथे वाद झाला. आणि तीने ती आमच्या फोटोसह जाहिरात दिली असे ते म्हणाले.नरेंद्र मोदी यांच्या मुख्य उपस्थित व्हायब्रंट गुजरात ही उद्योजकांची परिषद गुजरातध्ये झाली होती, त्यावेळी आम्हीही चिकूचा ज्यूस निर्माण करणारी कंपनी स्थापन केली तिच्यासाठी हे कर्ज घेतले होते. चिकूचे उत्पादन आणि त्याचा दर्जा, स्वाद हे एकसारखे नसते त्यात सतत बदल होत असतात, विशेष म्हणजे प्रत्येक हवामान आणि ऋतुनुसार त्याची चव बदलत असते. तसेच आम्हाला त्याचे मार्केटींगही जमले नाही, त्यामुळे ही कंपनी बंद पडली असे असले तरी तिने घेतलेले सर्व कर्ज मी सहा महिन्यात फेडून टाकेन असेही ते म्हणाले. आमच्या वसई विकास सहकारी बँकचे एनपीए हे एकेकाळी झीरो होते तर काही काळ मायनस होते, आता देखील ते निर्धारीत प्रमाणापेक्षा कमी आहे, हे बघून आमची लायकी ठरवा दुसऱ्या बँकेत आम्ही किती कर्ज घेतले आणि किती बाकी ठेवले यावर ठरवू नका, असे त्यांनी स्पष्ट केले. सोमवंशी समाजाची ही बँक आहे, १९७४ च्या सुमारास समाजाची एखादी वास्तू असावी म्हणून एक भूखंड घेण्यात आला. त्याकरीता समाजासाठी झटणाºयांनी निधी उभारला होता कालांतराने प्रत्येक गावात समाजाचा छोटा मोठा निधी उभारलेला होता, त्यातूनच मग पतसंस्था साकार झाली व तिचे रूपांतर बँकेत झाले. त्यावेळचे खासदार रविंद्र वर्मा आणि वसईचे आमदार पंढरीनाथ चौधरी व आप्पा हितेंद्र ठाकूर यांनी खूप मदत केली. त्यावर्षी तीनच बँकांना परवानगी मिळाली त्यात एक होती वसई विकास, दुसरी होती शिवसेनेची भवानी सहाकारी बँक आणि तिसरी होती गणेश नाईकांची कळवा बेलापूर सहकारी बँक. बँेकेचा कारभार सुरू करण्यासाठी एका वर्षात १ कोटी रूपये उभे करून दाखवायचे होते ते आम्ही करून दाखविले. अरूण वर्तक , हेमंत चौधरी, सुरेश चौधरी, जगदीश राऊत, नारायण वर्तक, भालचंद्र पाटील यांनी ही बँक साकारण्यासाठी खूप मेहनत घेतली आज बँकेच्या ठेवी अडीच हजार कोटींच्या पुढे आहेत. स्वत:चे डाटा सेंटर असलेली पहिली सहकारी बँक असा लौकीक तिने प्राप्त केला आहे. बँकेच्या वाटचालीत कसोटीचे क्षणही आले बँकेच्या नवघर शाखेवर पडलेला दरोडा त्यातले आरोपी डहाणूच्या देना बँकेवर दरोडा टाकतांना पकडले जाणे त्यात लुटली गेलेली ४८ लाखाची रक्कम परत मिळणे, हा एक क्षण होता तर दुसºया एका घटनेत आमच्या विरूध्द म्हणजे बँकेविरूध्द हित शत्रूंनी पोलीसांत गुन्हा दाखल केला. चौकशी लावली गेली या सगळया किटाळातून आम्ही निर्दोश बाहेर पडलो.कोण आहेत हेमंत म्हात्रे?हेमंत म्हात्रे हे विरारचे पिढीजात शेतकरी. त्यांची जवळपास २० एकर शेती आहे. अजूनही ते शेती करतात, शेतीसोबतच बिल्डींग मटेरीअल सप्लायर्सचा व्यवसायही ते करतात. मॅट्रीक झाल्यानंतर त्यांनी आयटीआय मधून इलेक्ट्रीशियन चा कोर्स केला. त्यांची आई अजूनही महापालिकेसमोर भाजी विकते तर वडील फुलांची विक्री करतात. बिल्डरचाही व्यवसाय ते करतात त्यांचा पिंड समाजसेवेचा असून ती पडद्यामाघे राहून करणे त्यांना आवडते. आता वसई, विरार, नालासोपारा जलमय झाले तेव्हा जीवदानी ट्रस्ट तर्फे ३० ते ३५ हजारांना मोफत जेवण अनेक दिवस दिले गेले. त्याची सिध्दता ते आणि त्यांचे सहकारी करीत होते. कुठलेही वाहन चालू शकणार नाही एवढे पाणी रस्त्यावर होते तेव्हा या भोजनासाठी लागणारी सामग्री आणि तयार झालेले जेवण स्वत:च्या जेसेबीमधून त्यांनीच नेले आणले होते. बँकेला आणखी उच्च पदावर नेण्याचा त्यांचा आणि त्यांच्या सहकाºयांचा निर्धार आहे. बँकेसाठी प्रारंभी लागलेला १ कोटीचा निधी त्यांनी घरोघरी जाऊन गोळा केलेला आहे. तेव्हा ते बँकचे पदाधिकारी नव्हते.एज्युकेशन लोन, वन टाइम सेटलमेंट आम्हीच सुरू केलीबँकेच्या मुख्यालयासाठी इमारत उभारायची होती त्यासाठी भूखंड हवा होता हे काम कमर्शियल दराने करवून घेणे बँकेला परवडणारे नव्हते. म्हणून मी माझ्या मालकीची जमीन बँकेला दिली व इमारतही बांधून दिली. विशेष म्हणजे त्या परिसरात कमर्शियल बांधकामाचा दर ६ हजार रूपये चौ. फू ट असतांन मी हे बांधकाम ३२५० रूपये चौ. फूटाने बांधून दिले. बांधकामचा करारनामा १४७३० चौ. फूटाचा होता प्रत्यक्षात मी १९०५९ चौ. फूट बांधकाम करून दिले तेही वाढीव एक पैै न घेता इतका स्वच्छ व्यवहार असतांना त्यात आम्ही गैैरव्यवहार केला असा आरोप करणारा हा गुन्हा नोंदविला गेला. विशेष म्हणजे त्यावेळी मी संचालकही नव्हतो. आम्ही त्यातून निर्दोष सुटलो. ज्यांनी हे किटाळ आणण्याचा प्रयत्न केला तेच बँकेला असे नडत असतात अडथळे निर्माण करीत असतात. एज्युकेशन लोन हे भारतीय बँकींग इंडस्ट्रीत आमच्यात बँकेने सर्वप्रथम सुरू केले.वन टाईम सेटलमेंट देखील आम्हीच सुरू केले. हे आम्ही नाही तर रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे नंतर या दोनही योजना इतर बँकांनीही कालांतराने सुरू केल्या त्याला रिझर्व्ह बँकेनेही मान्यता दिली. एवढे झाले तरी या हितशत्रुंची कारस्थाने थांबलेली नाहीत. जेव्हा यांनी गुन्हा दाखल केला तेव्हा समाजबांधवांना वाटले की आता बँक धोक्यात येते की काय या जाणिवेतून शेकडो समाजबांधव लाखो रूपये घेऊन संचालकांकडे आलेत आणि म्हणाले उद्या जर पैैसे काढून घेण्यासाठी गर्दी झाली आणि पैैसे देण्यासाठी कमी पडले तर हे पैैसे बिनव्याजी हवे तेवढे दिवस वापरा तेव्हा आमचा उर भरून आला होता. बँकेने ३२ व्या वर्षी शेडयूल्ड बँकेचा दर्जा प्राप्त केला राज्य आणि राष्टÑीय पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त केले. याचा आम्हाला अभिमान वाटतो असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार