शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

९३ अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत

By admin | Updated: January 23, 2016 02:45 IST

जव्हार तालुक्याला कुपोषण, रोजगार, बालमृत्यू, स्थलांतर हे भयानक प्रश्न भेडसावत असतांना आजही जव्हार तालुक्यातील ९३ अंगणवाड्या भाड्याच्या

जव्हार : जव्हार तालुक्याला कुपोषण, रोजगार, बालमृत्यू, स्थलांतर हे भयानक प्रश्न भेडसावत असतांना आजही जव्हार तालुक्यातील ९३ अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत भरत आहेत. त्यामुळे या आदिवासी ग्रामीण भागातील लहान मुलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कुपोषण, बालमृत्यू, रोगराई, आरोग्यस हानिकारक असे आजार होऊन अनेक अडचणी निर्माण होत आहेत. तालुक्यात सन- २०१२ पासून जवळपास ६५ अंगणवाड्यांची कामे चालू आहेत. तर उर्वरित २८ अंगणवाड्याची कामे प्रस्तावित आहेत. मात्र चालू असलेल्या अंगणवाड्यांच्या कामांना ४ वर्ष होऊनही अपूर्ण अवस्थेत आहेत. जव्हार तालुक्यात १ लाख ३० हजार लोकसंख्या असून, १०९ महसूल गावे, तर २७३ पाडे आहेत. जव्हार तालुक्यात दोन बाल विकास योजना प्रकल्प असून, बालविकास प्रकल्प योजना जव्हार- १ मध्ये ३७ अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत तर बालविकास प्रकल्प योजना साखरशेत- २ मध्ये ५६ अंगणवाड्या भरवल्या जात आहेत भाड्याच्या खोलीत. शासनाने पूर्ण झालेल्या अंगणवाड्या दाखवल्या आहेत. परंतु त्यांचीही कामे अर्धवट असून, निकृष्ट दर्ज्याचे बांधकामे, व मोडकळीस दरवाजे, खिडक्या, असून अवस्थेत अपूर्ण आहेत. अंगणवाड्यांची कामे संथगतीने होत असल्याने कामेही निकृष्ट दर्ज्याचे होत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थ करीत आहेत. चालू असलेली अंगणवाड्यांची कामे पूर्ण करण्यासाठी येथील ग्रामस्थांनी ग्रामसभेत विषय घेवून व गट विकास अधिका-यांकडे तक्रारी करूनही अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. जव्हार तालुक्यातील ९३ अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत भरवत असल्याने, अंगणवाडीतील कोवळ्या मुलांना अनेक समस्यांना तोंड देवून मुलांमध्ये आजाराचे प्रमाण वाढत आहे. तर पावसाळ्यात भाड्याच्या अंगणवाडीमुळे रात्रीच्या वेळी जनावरे अंगणवाडीत बसत आहेत. सकाळी तेथेच मुलांना बसावे लागत आहे. त्यामुळे मुलांमध्ये रोगराईचे प्रमाण वाढून अनेक वेळा त्याचे स्वरुन गंभिर होते, बहुतेक वेळा अशातून जिवावर बेतण्याचे प्रसंगही उद्भवतात. (वार्ताहर) आमच्या जांभळीचामाळ गावातील अंगणवाडी बांधकामाला ३ वर्ष झाली आहेत. तरीही बांधकाम अपूर्ण आहे, व निकृष्ट दर्ज्याचे खराब काम झाले आहे. आम्ही गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज करूनही काहीच उपयोग नाही. आम्ही ग्रामस्थांनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. - सुनील वड, पालकजव्हार तालुक्यातील ज्या अंगणवाड्याची बांधकामे अपूर्ण आहेत. ती पूर्ण करण्याच्या यापूर्वी अनेक सूचना, नोटीसा दिल्या आहेत.- श. शा. सावंत, गट विकास अधिकारी, पंचायत समिती जव्हार