शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पाम गावाच्या हद्दीतून ८०० गुरे गेली चोरीस, सीसीटीव्हीत झाले रेकॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 03:11 IST

पालघर : पाम ग्रामपंचायत अंतर्गत क्षेत्रातून सुमारे ८०० गुरे चोरीला गेली असून ही टोळी सीसीटीव्ही टीव्ही मध्ये कैद झाल्याने सातपाटी सागरी पोलिसांनी तिचा त्वरित छडा लावावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

हितेन नाईक पालघर : पाम ग्रामपंचायत अंतर्गत क्षेत्रातून सुमारे ८०० गुरे चोरीला गेली असून ही टोळी सीसीटीव्ही टीव्ही मध्ये कैद झाल्याने सातपाटी सागरी पोलिसांनी तिचा त्वरित छडा लावावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.बोईसर जवळील व सातपाटी सागरी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पाम गावात शेतकºयांची गुरे चोरण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे.चंद्रकांत पिंपळे ह्यांची गुरे अनेक दिवसांपासून गोठ्यात आली नसल्याने सर्वत्र शोध घेऊनही त्यांना ती आढळून आली नाहीत. त्यांनी पाम ग्रामपंचायती चे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ११ नोव्हेंबर रोजी रात्री १२.१५ वाजता एक स्कॉर्पिओ गाडीतून एक व्यक्ती खाली उतरते आणि रस्त्यात बसलेल्या गुरांना इंजेक्शन टोचून गाडीत बसून निघून जाते.काही वेळाने पुन्हा ती गाडी येते त्यातून तोंडाला फडके बांधून चार इसम उतरतात आणि अर्धमेल्या अवस्थेत निपचित पडलेल्या ४ गुरांना घेऊन गाडी निघून जाते. ही घटना पिंपळे ह्यांनी १६ नोव्हेंबर रोजीचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्या नंतर समजली. ह्याचाच अर्थ पाम ग्रामपंचायती कडून दररोज सीसीटीव्ही तपासले जात नसल्याचे सिद्ध होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.सागरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया पाम गावाला तक्र ार दाखल करण्यासाठी ३० किलोमीटर्स चा वळसा घालून सातपाटीला जावे लागते. तर दुसरी कडे पाम गाव बोईसर पोलीस स्टेशन पासून अवघ्या २ किलोमीटवर आहे.त्यामुळे पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या गावांची रचना, भौगोलिक परिस्थिती नुसार करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.>गुरे नेली कत्तलखान्यात?गुरे चोरीच्या घटनांत होणारी वाढ वेळीच रोखून आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली जात आहे. या प्रकरणाची नोंद सातपाटी सागरी पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली. गुरे चोरीची पद्धत पाहता त्यांना कत्तलखान्यात नेल्याचे जाणवते आहे.