शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात 800 लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 03:05 IST

जिल्ह्यात आठ केंद्रे : कोरोनायोद्धे लसीकरणास सज्ज

हितेन नाईक

पालघर : जिल्ह्यातील आरोग्य विभाग, पोलीस विभागातील कोरोनायोद्ध्याना १६ जानेवारी रोजी देण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील आठ केंद्रातून पहिल्या टप्प्यात ८०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करून प्रारंभ होणार आहे. 

डहाणू तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी शहरातील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण भागातील कासा उपजिल्हा रुग्णालयात दोन केंद्रे उभारली आहेत. पालघर नगर परिषद क्षेत्रातील सर जे.जे. रुग्णालयाच्या आरोग्य पथक केंद्रात (हेल्थ युनिट) एक केंद्र उभारण्यात आले आहे, तर तलासरी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयामध्ये एक लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. आदिवासी दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांसाठी जव्हार तालुक्यात नगर परिषद क्षेत्रातील पतंगशहा कुटीर उपजिल्हा रुग्णालयात एक केंद्र उभारण्यात आले आहे. तर वाडा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात एक लसीकरण केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. 

निगराणीखाली होणार अंमलबजावणी

१६ जानेवारी रोजी लसीकरण मोहिमेत डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका यांचा समावेश करण्यात आला आहे.

अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांच्या निगराणीखाली त्या त्या ठिकाणी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 

दुसऱ्याही टप्प्यातल्या लसीकरणासाठी आमची आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल थोरात यांनी सांगितले. 

प्रत्येक केंद्रावर १०० जणांना डोसवसई महापालिका क्षेत्रात विरार ग्रामीण रुग्णालयात एक तर वसईतील औद्योगिक वसाहतीतील वरुण इंडस्ट्रीज येथे अन्य एका लसीकरण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर त्या कार्यक्षेत्रातील १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना डोस दिला जाणार आहे.  

आठही ठिकाणी शीतगृहांची व्यवस्था  जिल्ह्यातील आठही ठिकाणी ही लस ठेवण्यासाठी शीतगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी ही लस २ ते ८ डिग्री सेल्सियस तपमानात ठेवण्यात येणार आहे.

पालघर जिल्ह्यामध्ये लसीकरणाबाबत सर्व सोपस्कार पूर्णपणे पार पडले आहेत. कुठल्याही प्रकारची अडचण न येता जिल्ह्यात ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.    - डॉ. अनिल थोरात    जिल्हा शल्य चिकित्सक, पालघर 

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार