शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यातील ७१ गावे पेसा घोषित, विकासाची नवी पहाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 03:26 IST

या जिल्ह्यातील वसई, डहाणू आणि तलासरी या तीन तालुक्यातील ७१ गावांना पेसा गावाचा दर्जा प्राप्त झाला आहे. याआधी एप्रिल मध्ये पालघर तालुक्यातील २१ गावांना पेसा दर्जा प्राप्त झाला होता.

पालघर : या जिल्ह्यातील वसई, डहाणू आणि तलासरी या तीन तालुक्यातील ७१ गावांना पेसा गावाचा दर्जा प्राप्त झाला आहे. याआधी एप्रिल मध्ये पालघर तालुक्यातील २१ गावांना पेसा दर्जा प्राप्त झाला होता. पंचायत विस्तार कायद्यानुसार आदिवासींच्या विकासाला चालना मिळावी तसेच त्यांची स्वशासन व्यवस्था बळकट होण्याच्या दृष्टीने या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या कायद्यान्वये जिल्ह्यातील पाडे, पाडयांचे समूह वाडी, वाड्याचे समूह वस्ती, पेसा गावे करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार या ७१ गावांना पेसा गावाचा दर्जा प्राप्त झाला आहे.याअंतर्गत डहाणू तालुक्यातील गंजाड आणि जामशेत ग्रामपंचायत मधील ३ गावांचा समावेश करण्यात आला असून तलासरी तालुक्यातील काजळ, वरवंडा व डोंगरी ग्रामपंचायतीच्या २० गावांचा समावेश आहेतर वसई तालुक्यातील भाताणे, गोमन, तिल्हेर , शिवणसाई, टोकरेखैरपाडा, पोमण, पारोळ, आडणे भिनार, माजीवली, करंजोळ ,सायवन, मेढे, सकवार अशा १३ ग्रामपंचायतीमधील ४८ गावांचा समावेश आहे.पेसा कायद्याचे अधिकार प्राप्त झालेल्या या गावांना यापुढे स्वतंत्र ग्रामसभा घेता येणार आहे. स्वत:चा ग्रामसभा कोष, लघु पाणी साठयाचे नियोजन करणे, गौण खनिजांचे नियोजन, अनुसूचित जमातीच्या जमिनींचे अतिक्र मण केलेली जमीन परत मिळवून देण्याचे अधिकार प्राप्त होणार आहेत.पाच टक्के निधी थेट खात्यात होणार जमापंचायत क्षेत्र विस्तार कायद्यामुळे अनुसूचित क्षेत्रामध्ये मोडत असलेल्या जिल्ह्यातील या ग्रामपंचायतीतील पाड्यांना आणि ग्रामसभाना त्यांचे विशेष अधिकार आणि नैसर्गिक साधन संपत्तीची खरी मालकी तसेच तिचे जतन व संवर्धन करण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे .अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीसाठी उपलब्ध होणाºया निधीपैकी आदीवासी उपयोजनेकरिता ५ टक्के निधी सर्व पेसा गावांच्या थेट खात्यात जमा करण्यात येईल.