शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचे 59 लाख पाण्यात; शहरातील १७ हॅण्डवॉश सेंटर वापराविना पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 00:13 IST

गर्दुल्ल्यांनी या हॅण्डवॉश सेंटरला आपला अड्डा बनवला आहे.  भाजीवाल्यांनीही कब्जा केला आहे. रात्रीच्या किंवा दुपारच्या सुमारास काही जण येथे झोपतात.

नालासोपारा : वसई-विरार महापालिकेने काेरोनाच्या काळात ठिकठिकाणी लावलेले हातधुण्याच्या केंद्रांचा वापर होत नसल्याने महापालिकेचे ५९ लाख ५० हजार रुपये पाण्यात गेले आहेत. या केंद्रातील नळ चोरीला गेले आहेत. गर्दुल्ल्यांनी या हॅण्डवॉश सेंटरला आपला अड्डा बनवला आहे.  भाजीवाल्यांनीही कब्जा केला आहे. रात्रीच्या किंवा दुपारच्या सुमारास काही जण येथे झोपतात.कोरोना हा विषाणूवाटे पसरणारा घातक आजार आहे. हा विषाणू हातावाटे नाकातोंडात जातो. त्यामुळे हात वारंवार धुणे, निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी  महापालिकेने शहरातील सर्व इमारतींना प्रवेशद्वारावर हात धुण्याचे सॅनिटायझर (हॅण्डवॉश बेसिन) बनवणे अनिवार्य केले. त्याचबरोबर शहरातील नागरिकांना कुठेही हात धुता यावे, निर्जंतुकीकरण करता यावे यासाठी हॅण्डवॉश सेंटर तयार केले. त्यासाठी लाखो रुपये खर्च केले. मात्र, नागरिकांची उदासीनता, पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा यामुळे शहरातील सर्व हॅण्डवॉश सेंटर वापराविना पडून आहेत. हॅण्डवॉश सेंटरवर कुणाची देखरेख नसल्याने तेथील नळ चोरीला गेले आहेत. काही ठिकाणी तर गर्दुल्ल्यांनी आपला अड्डा बनवला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक तेथे फिरकतही नाहीत. एका हॅण्डवॉश सेंटरसाठी साडेतीन लाखांचा खर्च पालिकेने केला आहे. पालिकेने शहरात एकूण १७ हॅण्डवॉश सेंटर उभारले होते. त्यामुळे पालिकेचा ५९ लाख ५० हजारांचा खर्च पाण्यात गेला आहे. पालिका अधिकाऱ्यांनी याबाबत  सांगितले की, सध्या या हॅण्डवॉश सेंटरचा उपयोग हात धुण्यासाठी होईल. नंतर पाणपोई म्हणून केला जाईल.शहरातील वसई येथील पापडी, पारनाका, रेंज ऑफिस, गावराई नाका, गोलानी नाका, अंबाडी रोड, सातिवली तर नालासोपाऱ्यात पाच, विरार येथे दाेन तर अन्य ठिकाणी अशी १७ हॅण्डवॉश सेंटर उभारलेली आहेत. शहरात १७ ठिकाणी हॅण्डवॉश सेंटर उभारली आहेत. नागरिकांनी कोरोनाला दूर ठेवण्यासाठी या केंद्रातून हात धुवावेत. नंतर, आम्ही या हॅण्डवॉश सेंटरचा उपयोग कायमस्वरूपी पाणपोईसाठी करणार आहोत. त्यामुळे पैसे वाया गेले असे म्हणता येणार नाही. - राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, वसई-विरार महापालिका