शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरारमधून ५९५ जण बेपत्ता

By admin | Updated: July 11, 2016 01:46 IST

वसई-विरारमधून गेल्या सहा महिन्यात ५९५ जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी असून त्यात अल्पवयीन मुलींची संख्या जास्त असल्यामुळे पालक भयभीत झाले आहेत

शशी करपे ,  वसईवसई-विरारमधून गेल्या सहा महिन्यात ५९५ जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी असून त्यात अल्पवयीन मुलींची संख्या जास्त असल्यामुळे पालक भयभीत झाले आहेत. तुळींज आणि वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेपत्ता झाल्याच्या अधिक तक्रारी दाखल झाल आहेत. यातील काही जणांचा शोध लागलेला असली तरी घरी परत आलेल्यांकडून पोलिसांना कळवले जात नसल्याने बेपत्तांबाबत ठोस माहिती उजेडात येणे कठीण बनत चालले आहे. वसई तालुक्यात विरार, अर्नाळा, नालासोपारा, तुळींज, वालीव, माणिकपुर, वसई अशी सात पोलीस ठाणी आहेत. या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५९५ जण गेल्या १८८ दिवसांत बेपत्ता झाले आहेत. तर १७४ जणांचे अपहरण करण्यात आल्याची नोंद झाली आहे. त्यात १४ ते १६ या वोगटातील मुली आणि मुलांचीही संख्या जास्त आहे. प्रेम प्रकरणातून यातील अधिक जण बेपत्ता झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, बेपत्ता प्रकरणातील काही गुन्ह्यांचा छडा पोलिसांनी लावलेला आहे. तर काही बेपत्ता घरी परतत असतात. मात्र, परत आलेल्यांची माहिती पोलिसांना कळवली जात नसल्याने बेपत्ता असलेल्यांचा आकडा दरवर्षी मोठा होत जातो, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तर बहुतेक मुली प्रेमप्रकरणातूनच घरातून पळुन जात असल्याचे पहावास मिळत असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. बेपत्ता आणि अपहरणची वाढती संख्या लक्षात घेऊन गेल्या महिन्यात वसई विरारसाठी स्वतंत्र अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखा सुरु करण्यात आली आहे.