शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

नवीदापचरी ५१ वर्षे वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 00:19 IST

प्रकल्पग्रस्त नवी दापचरी ग्रामपंचायतीला महसूली गावाचा दर्जा अद्याप न मिळाल्याने गेल्या ५१ वर्षापासून ती शासकीय योजना व सोयीसुविधा पासून वंचित असल्याने तेथील आदिवासींवर अन्याय होतो आहे.

मनोर : प्रकल्पग्रस्त नवी दापचरी ग्रामपंचायतीला महसूली गावाचा दर्जा अद्याप न मिळाल्याने गेल्या ५१ वर्षापासून ती शासकीय योजना व सोयीसुविधा पासून वंचित असल्याने तेथील आदिवासींवर अन्याय होतो आहे. तो दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तीला महसूली गाव घोषित करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.पालघर जिल्हातील डहाणू तालुक्यात दापचरी येथे आदिवासींचे गाव पाडे वसलेले होते त्यांची शेत जमीन ही होती परंतु ती सर्व जागा शासनाने दुग्ध प्रकल्पासाठी घेऊन पोलीस बळाचा वापर करून त्यांना बळजबरीने वाहनामध्ये भरून पालघर तालुक्यातील कोसबाड जवळील जंगलांत आणून वसवले त्या वेळी तिथे ते भीती पोटी राहायला लागले पाला पाचोळा, येणारी फळे, भाजा खाऊन पोटाची खळगी भरत होते हाताला काम नाही रहाण्यासाठी घर नाही अशी अवस्था त्यांची होती. काही वर्षाने शासनाने वन जमीन मोजून त्यांना शेती व घरांसाठी दिली व नवी दापचरी ग्रामपंचायत स्थापन केली त्या नंतर काबाड कष्ट करून मोलमजुरी करून हळूहळू एैपती प्रमाणे त्यांनी आपली घरे बांधलीत. आज नवीदापचरी ग्रामपंचायतीची स्थापना झाली तरी सुद्धा त्यांच्यावरील अन्याय कमी झालेला नाही. विक्रमगड व पालघर तहसीलमध्ये विभागलेली ही पंचायत आहे. त्यामुळे तेथील लोकांना दोन्ही तालुक्यात कामांसाठी हेलपाटे मारावे लागतात. तसेच महसुली गाव नसल्याने त्यांना रेशन तसेच घरकुल अशा अनेक योजनांपासून वंचित रहावे लागते.स्वतंत्र ग्रामपंचायत कधी घोषित होणार?महसूली गाव घोषित करण्यासाठी गावाची हद्द कायम करण्यासाठी जमीन मोजण्याची गरज आहे म्हणून आता पर्यंतपाच वेळा मोजणी करण्यात आली परंतु बोरंडा गावातील लोकांनी विरोध केला त्यामुळे मोजणी होऊ शकली नाही जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन जुन्या हद्दीला कायम केले आहे. त्या वरून महसुली गाव जाहीर करावे अशी मागणी तेथील शारदा कृष्ण सुतार सरपंच, उपसरपंच अंकुश टोकरे, कृष्ण सुतार, चंद्रकांत गडक, सदाशिव टोकरे, भिका कोम,शांताराम टोकरे व इतर ग्रामस्थांनी केली आहे. ती कधी पूर्ण होते? याकडे त्यांचे डोळे लागून राहिले आहे.