शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

५ लाखांच्या खंडणीसाठी नालासोपा-यातून अपहरण, तीन खंडणीबहाद्दरांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 05:59 IST

विरार : पाच लाखांची खंडणी न दिल्याने नालासोपा-यातील एका इसमाचे अपहरण केल्याप्रकरणी तुळींज पोलिसांनी पुणे येथील तिघांना अटक करून अपहृताची सुखरूप सुटका केली.

विरार : पाच लाखांची खंडणी न दिल्याने नालासोपा-यातील एका इसमाचे अपहरण केल्याप्रकरणी तुळींज पोलिसांनी पुणे येथील तिघांना अटक करून अपहृताची सुखरूप सुटका केली. नालासोपारा येथे राहणारे मनमीत उर्फ लकी सुचासिंग बाथ (३८) यांना त्यांचे पुणे येथील परिचयाचे हरिश चव्हाण (४२) याने जव्हार येथील आदिवासी समाज शैक्षणिक व सामाजिक संस्थेसाठी पाच लाख रुपयांची देणगी मागितली होती.२४ आॅक्टोबर २०१७ रोजी हरिश चव्हाणने मनमीत बाथ यांना पाच लाख रुपये घेऊन तुर्भे येथील एका हॉटेलमध्ये बोलावले होते. हरिश चव्हाण परिचयाचा असल्याने बाथ आपल्या विनोद मिश्रा या मित्रासह हरिशला भेटण्यासाठी गेले होते. बाथ यांनी पाच लाख रुपये आणले नसल्याचे सांगताच संतापलेल्या हरिशने आपल्या साथीदारांसह बाथ आणि मिश्रा यांना मारहाण केली. त्यानंतर बाथ यांना एका गाडीत कोंबून त्यांचे अपहरण केले. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणी बाथ यांची सुखरूप सुटका करतानाच खंडणीखोरांना अटक करण्यासाठी तुळींज पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर खैरनार यांनी पथके तयार करून शोधमोहीम हाती घेतली होती. त्यांनी प्रमुख आरोपी हरिश चव्हाण (४२, रा. कोथरूड), गजानन कवतीकर (२५, रा. बालेवाडी), समीर शेख (२५, रा. येरवडा) यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली.

टॅग्स :Kidnappingअपहरण