शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

सदभाव कंपनीच्या विरोधात चालकांनी केला ५ तास अहमदाबाद हायवे जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 03:18 IST

मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग वरील दापचरी सीमा तपासणी नाक्यावर सदभाव कंपनीच्या विरोधात गुजरात आणि महाराष्ट्राकडे जाणा-या वाहतूकधारकांनी ५ तास चक्का जाम केला.

- सुरेश काटे ।तलासरी : मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग वरील दापचरी सीमा तपासणी नाक्यावर सदभाव कंपनीच्या विरोधात गुजरात आणि महाराष्ट्राकडे जाणा-या वाहतूकधारकांनी ५ तास चक्का जाम केला. यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूला वाहनांच्या १० किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या. याचा फटका बस चालक, शाळकरी विद्यार्थी तसेच रुग्णवाहिकांना बसला. चक्का जाम केल्याचे समजताच तलासरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केशव नाईक यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती आटोक्यात आणली दापचारी तपासणी नाक्यावर अवजड वाहने पास करताना वाहन धारकाकडून १००० ते ५००० हजार पर्यंत पैसे उकळले जातात, आरटीओ अवैधरित्या वाहने सोडत असून अशा टोळ्या या ठिकाणी सक्रिय आहेत.दापचरी सीमा तपासणी नाक्यावर दोन्ही बाजूला १२ बूथ आहेत त्याद्वारे सदभाव कंपनी टोल आकारणी करते तर आरटीओ अवजड वाहनांची तपासणी करून अतिररिक्त दंड आकारणी करून चालकांचे आर्थिक शोषण करीत असल्याचा आरोप चालकांकडून करण्यात येत होता. मात्र १२ बूथ पैकी फक्त दोनच बूथ सुरू ठेऊन वाहनांची मोठ्या प्रमाणात रांग लागून तिचा मोठा त्रास चालकांना होत होता त्याचाच उद्रेक होऊन आज चक्का जाम करण्यात आले. सीमा तपासणी नाक्यावर सदभाव कंपनी अवजड वाहने सेटिंग करून पास करते. परंतु ज्यांची सेटिंग नाही त्यांना अतिरिक्त दंड आकारून त्यांची लूट होत असल्याचा आरोप चालकांकडून होत आहे.याबाबत वाहन चालक आणि मालकांनी वारंवार तक्रारी करूनही सदभाव कंपनी दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप आंदोलकांनी केला व १२ पैकी ८ बूथ सुरू करण्याचे लेखी आश्वासन कंपनी देत नाही तोपर्यत चक्काजाम सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. कंपनीच्या अधिकाºयांनी लेखी आश्वासन दिल्या नंतर पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले.आठ बूथ सुरू करण्यात येणार असून या पुढील काळात वाहतूकीचा खोळंबा होणार नाही असे आश्वासन दिल्या नंतर वाहतूक सुरळीत झाली. तसेच अवजड वाहतूक करणाºया टोळ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतरच वाहतुकदारांनी वाहतूक सुरू केली.