शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

‘एक गाव एक गणपती’ची ४८ वर्षांची परंपरा कायम; उर्सेगावचा जनतेसमोर आदर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:08 IST

शासनाच्या कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन

शशिकांत ठाकूरकासा : डहाणू तालुक्यातील कासा भागातील कुणबी व आदिवासी समाजाची लोकवस्ती असलेल्या उर्से गावाने ‘एक गाव एक गणपती’ उत्सवाच्या माध्यमातून जनतेसमोर एक आदर्श उभा केला आहे.

गेल्या ४८ वर्षांपासून उर्से गावातील सर्व समाजाच्या महिला, पुरुष व मुले एकत्र येऊन सार्वजनिक गणेशोस्तव आणि सार्वजनिक गौरी उत्सव, नवरात्रोत्सव आदी उत्सव आनंदाने साजरे करत आहेत. यंदाचे ४८ वे वर्ष असून या गावाची लोकसंख्या जवळपास अडीच हजारच्या आसपास आहे.

दरवर्षी गणपती व गौरी उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे व खेळांचे आयोजन केले जाते. या गावाला आध्यात्मिक परिवाराची शिकवण आहे. हाच आदर्श या गावाने जोपासला आहे. कोणत्याही घरी घरगुती गणपती बसवला जात नाही. म्हणून संपूर्ण गाव एकाच ठिकाणी एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करते. गणपती उत्सवात गावातील तरुणवर्ग एकत्र येऊन टाकाऊ वस्तूतून सजावट तयार करतात. यंदा इको फ्रेंडली मखर बनवण्यात आला. तर सजावटीमर्ध्ये साधेपणाने आकाश तारांगण तयार करून जात्यावर दळण दळणारी महिला मास्क बांधून गणेशमूर्तीच्या बाजूला आपले काम करीत आहे व कोरोनाविरोधात संदेश देताना दाखविण्यात आली आहे.मुख्य म्हणजे या गावामध्ये तीन मंडळे कार्यरत असूनही कोणत्याही प्रकारची वर्गणी गावाच्या बाहेरून स्वीकारली जात नाही. सर्व खर्च गावकरीच गोळा करतात. या गावाने कार्यक्रमासाठी आपले स्वत:चे भव्य सभागृह कोणतीही देणगी न घेता उभे केले आहे.

गावाचे सर्व ग्रामस्थ याच सभागृहात आपले सर्व सण एकत्र साजरे करतात. तर सर्व कामेही श्रमदानातून केली जातात. या गावाची परंपरा अशी की, गणपती व गौरी विसर्जनानंतर शिल्लक राहिलेल्या सर्व वस्तूंचा लिलाव केला जातो. देवावरील श्रद्धेमुळे गावकरी सर्व गणेशोत्सवातल्या वस्तू चढ्या भावाने आनंदाने खरेदी करतात. यामधून उरलेले पैसे गरजवंत गाव शेतकऱ्यांना व्याजाने वाटप केले जातात. पुढील वर्षी याच पैशांतून हे सण साजरे करतात. अशा प्रकारे उर्से गावाने सामाजिक भावनेतून संघटित व्हावे हा एकतेचा सामाजिक संदेश या माध्यमातून जनतेला देण्याचा प्रयत्न केला आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव