पालघर : जिल्ह्यातील शाळा बाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने शनिवारी करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार जिल्ह्यात एकूण चार हजार ४०४ शाळाबाह्य मुले आहेत. सर्वात जास्त मुले डहाणू तालुक्यात तर सर्वात कमी वाडा तालुक्यात असल्याची माहिती जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली.बालकांना मोफत आणि सक्तीपर शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे. असे असूनही राज्यात मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य मुले आढळून येत होती. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात अणण्याचा दृष्टीने ४ जुलै रोजी जिल्ह्यात हे सर्वेक्षण करण्यात आले. शिक्षण विभागाचे सचिव नंदकुमार यांनीही पालघर जिल्ह्यातील विविध भागात फिरून सर्वेक्षणाच्या कामकाजासंदर्भात भेटी देत पहाणी केली. महापालिका हद्दीतील आकडेवारी उपलब्ध न झाल्याने या यादीत शाळाबाह्य मुलांचा समावेश करण्यात आलेला नसल्याची माहिती जि.प.चे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली. (वार्ताहर)शाळाबाह्य मुलांची आकडेवारी -डहाणु (१,७६९)तलासरी (७७५)पालघर (६८६)जव्हार (५३२)विक्रमगड (३२८) वाडा (८४)
जिल्ह्यात ४ हजार शाळाबाह्य मुले
By admin | Updated: July 6, 2015 04:01 IST