शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदाराकडून एकाच वेळी चार-चार महिन्यांचे ‘पोषण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2023 11:04 IST

तांदळात अळ्या, कडधान्याला कीड; शिक्षक- बचत गट हैराण

- रवींद्र साळवे 

मोखाडा : तालुकाच नव्हे तर संपूर्ण पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांना मिळणाऱ्या पोषण आहाराच्या पुरवठ्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे चित्र असून, वाहतुकीचा खर्च वाचविण्यासाठी पोषण आहारातील कच्च्या मालाचा पुरवठा एक किंवा दोन महिन्याचा करावयाचा सोडून शाळांना मात्र तीन ते चार महिन्यांचा धान्य पुरवठा एकदाच केला जातो. यामुळे कालांतराने तांदळात जाळ्या होतात, हरभरा-वाटाणे हे कडधान्य आतून किडलेले असते. यामुळे विद्यार्थ्यांना हे धान्य शिजवून देताना शिक्षक आणि बचतगटांची चांगलीच पंचाईत होताना दिसत आहे. 

प्रशासनाचे अधिकारी संबंधित ठेकेदाराला सांभाळून घेतात. त्यामुळे शिक्षकही तक्रार कोठे करावी आणि अधिकारी वर्गाचा रोष कसा पत्करायचा, या विवंचनेत असल्यामुळे हा पुरवठ्याचा घोळ राजरोसपणे सुरूच आहे. यामुळे नियमाला धरून धान्य न देणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. 

जिल्हा परिषदेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नमध्यान्ह भोजन योजनेसाठी पोषण आहाराचा पुरवठा होत असतो. यामध्ये तांदूळ, तेल, हरभरा, वाटाणा यासोबतच अनेक मसाले पाकीट वगैरे धान्यांचा पुरवठा होतो, मात्र या पुरवठ्याबाबत अनेक शिक्षकांनी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्यासमोरच अडचणींचा पाडा मांडला.

प्रमाणित वजनकाट्याऐवजी हातकाट्याचा वापर

    तांदूळ कधीच मोजून दिला जात नाही, मात्र प्रत्येक गोणीत तांदूळ हा अपेक्षित वजनापेक्षा कमी असल्याचे दिसून येते. याशिवाय बाकी धान्य मोजण्यासाठी प्रमाणित केलेले वजनकाटे न वापरता थेट हातकाट्याचा वापर केला जातो. यामुळे बाकी धान्याच्याही मापात पाप होत असल्याचे निर्दशनास आले आहे. 

    धान्याचा पुरवठा शासन नियमांनुसार दर १ किंवा २ महिन्याला करावयाचा असतो. त्यासाठीची तरतूदही शासन करत असते, मात्र संबंधित ठेकेदार आपल्या वाहतुकीचे पैसे वाचावेत म्हणून जवळपास तीन-चार महिन्यांचा धान्य पुरवठा एकदाच करून मोकळा होतो. यामुळे कालांतराने या धान्याला कीड लागते, अशा तक्रारी आहेत. 

शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत याबद्दल अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मी शिक्षकांना आवाहन करतो की, महिन्याचा माल घ्यावा, धान्य दर्जा आणि वजन बघूनच माल स्वीकारावा. तुम्हाला कोणालाही घाबरण्याची गरज नाही. थेट माझ्याकडे तक्रारी केल्या तरी चालतील.- प्रकाश निकम, अध्यक्ष, पालघर जिल्हा परिषद

टॅग्स :palgharपालघर