शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील चार कोटी ३५ लाख पाण्यात; कोंढले-खैरे रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 01:00 IST

नागरिकांची वाट बिकटच, कोंढले-खैरे या साडेचार किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम गजानन कन्स्ट्रशन या ठेकेदार कंपनीला देण्यात आले होते.

वाडा : तालुक्यातील कोंढले-खैरे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सन २०१८ मध्ये पंतप्रधान ग्रामसडक योजनेमधून प्रशासनाने ४ कोटी ३५ लाखांचा निधी या रस्त्यासाठी मंजूर करून हा संपूर्ण रस्ता नव्याने बनविण्यात आला होता. परंतु, या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याने मे मध्ये बनविलेला रस्ता त्याच वर्षी जूनमध्ये उखडला गेल्याने शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले. सध्या या रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झाल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांची वाट मात्र बिकटच झाली आहे.

कोंढले-खैरे या साडेचार किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम गजानन कन्स्ट्रशन या ठेकेदार कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीने या कामाचा ठेका वाड्यातील सब-ठेकेदारांना दिले.  परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी केल्या; परंतु ग्रामस्थांच्या तक्रारी केराच्या टोपलीत पडल्याने या सब-ठेकेदाराने हे पूर्णपणे काम दर्जाहीन केल्याने या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून रस्त्याचा पुरता बोजवारा उडाला आहे. पाच वर्षे या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती ठेकेदार कंपनीने करायची होती; परंतु केवळ थातूरमातूर काम करून ठेकेदारांनी या रस्त्याकडे पाठ फिरवल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

या रस्त्याचे काम सुरू असताना ते निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे वारंवार या रस्त्यावर देखरेख करणाऱ्या शाखा अभियंत्याच्या निदर्शनास आणून दिले होते; परंतु त्यांनी दुर्लक्ष केल्याने या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास त्याला संबंधित अधिकारी व ठेकेदारच जबाबदार असतील.- अल्पेश पांडव, ग्रामस्थ, खैरे

या रस्त्याचे काम चार वर्षांपूर्वी करण्यात आले. रस्त्यावरून अवजड वाहतूक होत असल्याने रस्ता नादुरुस्त होत आहे. अद्याप देखभाल व दुरुस्तीसाठी एक वर्ष शिल्लक असून, संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याची दुरुस्ती करून घेण्यात येईल.- विनोद घोलप, शाखा अभियंता, पंतप्रधान ग्रामसडक योजना, पालघर

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक