शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

२१ रेतीमाफियांवर गुन्हे

By admin | Updated: January 22, 2017 02:56 IST

वसई तालुक्यातील नवसई आणि चांदीप रेती बंदरातील अवैध रेती उत्खननांवर महसूल खात्याने धाड टाकली. परंतु आधीच सावध झालेल्या वाळूमाफियांनी नदी पात्रात असलेल्या

विरार : वसई तालुक्यातील नवसई आणि चांदीप रेती बंदरातील अवैध रेती उत्खननांवर महसूल खात्याने धाड टाकली. परंतु आधीच सावध झालेल्या वाळूमाफियांनी नदी पात्रात असलेल्या २१ संक्शनपंप आणि बोटीसह पलायन केले. त्यामुळे फक्त ६९ ब्रास रेती जप्त करता आली. हाती लागलेल्या २१ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवसई बंदरात बेकायदेशिरपणे रेती उत्खनन केल्याप्रकरणी नवसई गावातील राजेश बाबूराव पाटील, कल्पेश मोरेश्वर कुडू, योगेश अरुण पाटील, सदानंद महादेव कुडू, कृपेश मंगळ पाटील, संकेत सदानंद कुडू, मितेश सदानंद कुडू, प्रदीप रविंद्र कुडू आणि भाताणे गावातील प्रभाकर हरिश्चंद्र कासार या बोटी आणि सक्शन पंप मालकांविरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल खात्याच्या पथकाने त्यानंतर चांदीप रेती बंदरात धाड टाकली. यावेळी तानसा नदीपात्रात १२ बोटी सक्शनपंपासह बेकायदेशिरपणे रेती उत्खनन करताना आढळून आल्या. मात्र, पथकाची चाहूल लागताच बोटी सक्शन पंपासह नदीपात्रातून पसार झाल्या. यावेळी रेती बंदरात ४२ ब्रास रेती साठा आढळून आला. चौकशीनंतर महसूल खात्याने बेकायदेशिरपणे उत्खनन केल्याप्रकरणी चांदीप गावातील धनंजय पुंडलिक तरे, रुपेश दत्तात्रेय पाटील, नितीन दत्तात्रेय पाटील, रविंद्र एकनाथ किणी, योगेश बळीराम पाटील, संदेश जगन्नाथ घरत, अरुण नारायण किणी, स्वप्नील रविंद्र कुडू, रोशन भालचंद्र पाटील, राजू पद्माण किणी, रुपेश बळीराम पाटील, कौशिक नारायम गावय्ऋ या बोटी आणि सक्शन पंप मालकांविरोधात विरार पोलिसांत गुन्हा दाखल केला. (वार्ताहर)मंडळ अधिकारी शशिकांत पाटील, तलाठी शैलेंद्र तिडके, किरण कदम आणि राजेश पाटील यांच्या पथकाने तानसा नदीतून चांदीप आणि नवसई रेती बंदरावर धाडी मारल्या. धाडीत नवसई रेती बंदरात नदी पात्रात सक्शन पंप बोटीसह बेकायदेशीरपणे रेती उत्खनन सुुरु असल्याचे आढळून आले. मात्र, महसूल खात्याचे अधिकारी आल्यानंतर स्नशन पंपासह बोटी गायब झाल्या. यावेळी रेती बंदरावर २७ ब्रास रेती साठा आढळून आला.