विक्रमगड : तालुक्यातील ७८९ निराधार विधवा महिलांना, अपंग, वृध्द निराधार व ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनाच्या कुटुंब अर्थसहाय, इंदिरागांधी, श्रावणबाळ, वृध्दपकाळ, संजयगांधी अशा विविध योजनेचेअंतर्गत १९ लाख २४ हजार २०० रुपयांच्या अर्थसहाय्याचे वाटप करण्यात आले. तहसिलदार सुरेश सोनावणे निवासी तहसिलदार एस. कामडी व समितीचे अध्यक्ष संदिप पावडे यांनी ही प्रक्रीया पार पाडली. तालुक्यातील २७ विधवा लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचा धनादेश देण्यांत आले आहेत़. तर अजून २० अर्ज प्रलंबित आहेत. (वार्ताहर)
तीन महिन्यांत १९ लाखांचे वाटप
By admin | Updated: February 21, 2017 05:11 IST